बडोद्याचे महाराज सयाजीराव तृतीय यांनी आपल्या कारकीर्दीत बडोदा राज्य वैभवसंपन्न केले, त्याचप्रमाणे आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ या राजवाडय़ाच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेला या राजवाडय़ात राज्यकर्त्यांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता. सयाजीरावांनी मेजर माँट या ब्रिटिश इंजिनीअरकडून या वास्तूचा आराखडा तयार करून घेतला. १८९० साली बांधून पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद बांधकाम असलेल्या या राजवाडय़ाच्या मनोऱ्याची उंची आहे २०४ फूट. राजदरबाराच्या मुख्य दिवाणखान्याचे आकारमान आहे ९४ फूट लांब, ५४ फूट रुंद व २२ फूट उंच. खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा दरबार हॉलमध्ये बसविण्यासाठी व्हेनिसचेच बारा कारागीर अठरा महिने काम करीत होते. या दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलीची याने बनविलेले संगमरवरी पुतळे असून राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी हॉलच्या पहिल्या मजल्यावर गॅलऱ्या आहेत.
राजवाडय़ातील संपूर्ण फíनचर फ्रान्समध्ये तयार केलेले असून दक्षिणेकडील भागात महाराजांचे निवासस्थान आहे. विशेष म्हणजे त्या काळात तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी विजेवर चालणाऱ्या लिफ्टची सोय होती.
‘लक्ष्मीविलास’च्या परिसरात असलेल्या मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारतींमध्ये शस्त्रागार आणि महान चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली तलचित्रे आहेत. राजवाडय़ाभोवतीच्या परिसरात असलेली उद्याने, हिरवळीची कुरणे आणि कारंजी विल्यम गोल्डिरग या ब्रिटिश उद्यानतज्ज्ञाने तयार केली आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: सौम्य स्वच्छक यंत्रे –  भाग २
जुन्या किंवा पारंपरिक काळात उपयोगात येत असलेली सौम्य उकलक यंत्रे खालीलप्रमाणे.
टप्पा स्वच्छक (स्टेप क्लीनर) : या यंत्रात ६ आघातक वापरले जात असून ते ४५ अंशाच्या रेषेमध्ये बसविलेले असतात. आघातकांचा फिरण्याची गती साधारणपणे ६०० फेरे प्रति मिनिट इतकी असते. प्रत्येक आघातकाच्या खाली दांडय़ाची जाळी बसविलेली असते. कापूस प्रथम सर्वात खालच्या आघातकला भरविला जातो. हा आघातक येणाऱ्या कापसाला झोडपतो व स्वत:च्या गतीबरोबर त्याला पुढे नेऊन पुढच्या आघातकास भरवितो. हा कापूस आघातकाच्या खाली असलेल्या दांडय़ाच्या जाळीवरून जात असताना कापसातील कचरा जाळीमधून खाली पडतो. याच क्रियेची पुनरावृत्ती सर्व सहा आघातकांच्या बाबतीत होते.
एक आघातकी स्वच्छक (मोनो सििलडर क्लीनर) : या यंत्रात एक मोठा पोकळ व वजनाने हलका असा आघातक असतो. गाठी उकलकापासून हवेच्या साहाय्याने कापूस उचलून या यंत्रात टाकला जातो. आघातकावर पोकळ व परिघावर ९० अंशाच्या फरकाने चार ओळीत दांडय़ा बसविलेल्या असतात. sam05आघातकाच्या खालील बाजूस जवळजवळ तीनचतुर्थाश परिघावर जाळीच्या दांडय़ा बसविलेल्या असतात. यंत्रात हवेच्या साहाय्याने येणाऱ्या कापसावर आघातक आघात करतो आणि सुटा झालेला कापूस तो आपल्याबरोबर परिघाच्या दिशेने घेऊन जातो. या यंत्राची रचना अशी असते की कापूस आघातकास लंब दिशेने न येता तो आघातकाच्या आसास समांतर दिशेने येतो व पुढे सरकतो. यामुळे कापूस यंत्राच्या बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी दोन ते तीन वेळा आघातकाभोवती फिरतो. तितक्याच वेळा तो दांडय़ाच्या जाळीवरून जातो आणि कचरा मोठय़ा प्रमाणात वेगळा करण्यात या क्रियेची मदत होते.
अक्षीय प्रवाही स्वच्छक (अ‍ॅक्सी फ्लो क्लीनर) : या स्वच्छकाची रचना व कार्य हे एक आघातकी स्वच्छकासारखेच असते. फक्त फरक इतकाच की या यंत्रात दोन आघातक एकमेकास समांतर असे बसविलेले असतात. पूर्वी एक सौम्य स्वच्छक एका िपजणयंत्रणेला कापूस पुरवीत असे, परंतु आजच्या काळात वापरले जाणारे स्वयंचलित गाठ उकलक यंत्र दोन िपजणयंत्रणांना कापूस पुरविते आणि म्हणून दोन िपजणयंत्रणांना कापूस पुरवील असे अधिक उत्पादन देणारे सौम्य स्वच्छक यंत्र शास्त्रज्ञांना विकसित करावे लागले.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
take action against municipal officials for supporting illegal buildings in dombivli demand by ub shiv sena consumer cell chief demand to cm
डोंबिवलीतील बेकायदा इमारतींना आशीर्वाद देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुखाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Justice Sunil Shukre committee to search for Chief Information Commissioner Mumbai news
मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी न्या. शुक्रे यांची समिति; चौफेर टीकेनंतर राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Story img Loader