-
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच पसरली आहे. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलिवुड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलिवुड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे. आपल्या आगामी ‘मदारी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने राष्ट्रीय पारितोषीक विजेता अभिनेता इरफान खान थुकरटवाडीमध्ये येणार आहे. नुकतंच इरफानच्या या भागाचं चित्रीकरण झालं असून येत्या सोमवारी म्हणजेच १८ जुलैला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून हा भाग प्रसारित होणार आहे.
-
आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. ‘हासिल’, ‘मकबुल’, ‘पिकू’, ‘पानसिंग तोमर’, ‘लंचबॉक्स’, ‘तलवार’सारख्या वेगळ्या धाटणीच्या हिदी चित्रपटांपासून ‘लाइफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप इरफानने सोडली आहे.
-
इरफान खानचा चित्रपट म्हटलं की काही तरी वेगळं बघायला मिळणार हे प्रेक्षकांना माहित असतं त्यामुळे तेही त्याच्या चित्रपटाची वाट बघतात.
-
आता इरफानचा ‘मदारी’ हा नवा चित्रपट येतोय ज्याचं दिग्दर्शन आपला मराठमोळा लय भारी दिग्दर्शक निशिकांत कामतने केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इरफान थुकरटवाडीत आला त्याच्या सोबतीला चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले तुषार दळवी आणि उदय टिकेकर ह मराठमोळे अभिनेतेही होते.
-
आपल्या गावात आलेल्या मान्यवर पाहुण्यांच्या एखाद्या चित्रपटावर आधारित स्वतःची वेगळी कलाकृती सादर करणे ही थुकरटवाडीची जणू परंपराच. याही भागामध्ये इरफान खान यांच्या ‘बिल्लू’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या दोन गाजलेल्या चित्रपटांवरून त्यांनी आपलाच चित्रपट तयार केला ज्याचा इरफाननेही मनसोक्त हसून आनंद लुटला.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?