-
पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता हास्यपंचमी साजरी करत आहे.
-
आठवड्यातले पाचही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळतो आहे.
-
यंदाच्या आठवड्यात म्हणजेच १६ आणि १७ मे रोजी रसिकांचं मनोरंजन वाढणार आहे.
-
कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर येणार आहेत राज्याचे सर्वाजनिक बांधकाम, नगरविकासमंत्री मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे.
-
अनेक सभांमधून, भाषणांतून जनतेची मनं जिंकणारे एकनाथ शिंदे निखळ मनोरंजनाचा खास आस्वाद घ्यायला येणार आहेत.
-
एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदेसुद्धा येणार असून, हास्याच्या मंचावर हे दिग्ग्ज खळखळून हसणार आहेत.
-
आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं.
-
अभिनेता प्रसाद ओक याचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे.
-
लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार हास्याच्या मंचावर येणार आहेत.
-
‘धर्मवीर’ या चित्रपटाची सगळीकडेच खूप चर्चा आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाची टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर येणार आहे.
-
या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे.
-
हास्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरेल.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं असून निर्माते मंगेश देसाई आहेत.
-
चित्रपटाचा संपूर्ण टीम नक्की कशी धमाल करणार, हे बघण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहत राहा.
-
(सर्व फोटो सौजन्य : यूट्यूब)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल