दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची बक्षीस योजना
पिंपरी पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि सरकारी शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण दिले जाते, हा संदेश देण्याच्या हेतूने महापालिकेने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना सुरू केली. त्यानुसार, या वर्षी ११ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. तर, ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार व ५८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजाराचे बक्षीस मिळणार आहे.
पालिका शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांस ९० ते १०० टक्के दरम्यान गुण मिळाल्यास प्रत्येकी एक लाख रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळाल्यास प्रत्येकी ५० हजार रुपये आणि ८० ते ८४. ९९ टक्के गुण मिळाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येते. यंदा दहावीतील ११ विद्यार्थ्यांना लखपती होण्याचा मान मिळाला आहे. त्यामध्ये, सोनल बिराजदार (९४.२ टक्के, थेरगाव विद्यालय), दीपक शिंदे (९३.४ टक्के, िपपळे गुरव), गौरी कुलकर्णी (९३ टक्के, थेरगाव), आकांक्षा भोरे (९२. ४ टक्के, पिंपळे गुरव), सादिया अन्सारी (९२.४ टक्के, वाकड), हृतिक िझजुर्डे (९१.६ टक्के, िपपळे सौदागर), जुवेरिया मोमीन (९१.२ टक्के, आकुर्डी), सुमीत जाधव (९०.६ टक्के, पिंपळे सौदागर), ऐश्वर्या डोळस (९०.४ टक्के, भोसरी), सीमा जाधव (९०.२ टक्के, खराळवाडी) आणि मानसी मेश्राम (९० टक्के, पिंपळे सौदागर) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय, ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार, तर ५८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजाराचे बक्षीस आहे. त्याचप्रमाणे १२ अंध व अपंग विद्यार्थ्यांनाही स्वतंत्रपणे बक्षीस देण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने समारंभपूर्वक ही बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

Story img Loader