पिंपरी चिंचवडमध्ये एका भाजीविक्रेत्याने १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.बलात्कारानंतर नराधमाने त्या तरुणीच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला असून या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. इलाही हुसेनलाल शेख
असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित तरुणी कामानिमित्त बाहेर जात असताना तिला इलाही हुसेनलाल शेख भेटला. इलाही हा भाजीविक्रेता असून पीडित तरुणी त्याला आधीपासून ओळखत होती. दुचाकीवर सोडतो असे सांगत इलाहीने तिला गाडीवर बसवले आणि वल्लभनगर बस स्थानकामागील निर्जन स्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडित तरुणीने प्रतिकार केला असता इलाहीने तिच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. त्या परिस्थितीतही पीडितेने प्रतिकार करत कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली आणि  घटनास्थळाजवळील वर्क शॉपमध्ये धाव घेत मदत मागितली. रक्तबंबाळ अवस्थेमध्येच पीडित तरुणी दुकानात पोहोचली होती. सध्या पीडितेवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी इलाहीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहे.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Story img Loader