टाटा मोटर्सचा चिखलीतील कार प्रकल्प जुलै महिन्यात सहा दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता १५ ऑगस्टच्या सुट्टीला जोडून तीन दिवस हा विभाग बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. औद्योगिक मंदीचा फटका बसल्याचे कारण देत व्यवस्थापनाने ‘ब्लॉक क्लोजर’ चा निर्णय घेतला असून तशी नोटीस कंपनीत लावण्यात आली आहे.
जुलैच्या महिनाअखेरीस २६ ते ३१ जुलै दरम्यान सहा दिवस टाटा मोटर्सने ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर केला होता. त्यानुसार हा विभाग बंद ठेवण्यात आला होता. आता १६ ते १८ असे तीन दिवस कार प्रकल्प बंद राहणार आहे. मागणी नसल्याने उत्पादन कमी करावे लागत असल्याचे कंपनीने नोटिशीत म्हटले आहे. १५ ऑगस्टची सार्वजनिक सुट्टी असून पुढील तीन दिवस कंपनी बंद राहणार आहे. या कालावधीत दीड दिवसाची रजा व दीड दिवसाचा पगार असे धोरण व्यवस्थापन व कामगार संघटनेने ठरवले आहे. कार प्रकल्पात मध्ये इंडिका, इंडिगो गाडय़ांचे उत्पादन केले जाते. या विभागात जवळपास तीन हजार कामगार असून दररोज १२०० मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, सद्यस्थितीत जेमतेम उत्पादन होत आहे. या मंदीचा फटका कंपनीप्रमाणे िपपरी पालिकेलाही बसतो आहे. टाटा मोटर्सकडून येणाऱ्या नेहमीच्या उत्पन्नापेक्षा खूप कमी उत्पन्न मिळते आहे.
टाटा मोटर्सचा चिखलीतील प्रकल्प पुन्हा तीन दिवस बंद – व्यवस्थापनाकडून औद्योगिक मंदीचे कारण
टाटा मोटर्सचा चिखलीतील कार प्रकल्प १५ ऑगस्टच्या सुट्टीला जोडून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
First published on: 10-08-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2nd block closure of tata motors chikhli from 15th august