पिंपरी भाजपमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या गटबाजीला तात्पुरती विश्रांती देऊन शहराध्यक्ष सदाशिव खाडे व पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार यांनी एकत्रितपणे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पाठिंबा दिला. मात्र, दुसऱ्याच दिवशी गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय व पिंपरी विधानसभेचे भाजपचे उमेदवार अमर साबळे यांनी वेगळाच सूर काढत परदेशींची बदली योग्यच असून सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आयुक्त परदेशी यांचे काम निश्चितपणे चांगले आहे. जनहिताचेच अनेक निर्णय त्यांनी घेतले, सुधारणा केल्या. प्रशासनात शिस्त आणली. उधळपट्टीला चाप लावला. मात्र, तरीही त्यांच्या अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचे समर्थन करता येणार नाही. कर्ज काढून, वेळप्रसंगी दागिने गहाण टाकून नागरिकांनी घरे बांधली. ती  डोळ्यासमोर पाडताना काय वेदना होत असतील, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे व न्यायालयाच्या आदेशामुळे ही परिस्थिती ओढावली, हे मान्य केले तरीही ज्या पध्दतीने आयुक्त पाडापाडी करत आहेत, त्याबाबत त्यांचे आणखी कोडकौतुक करू नये. कारण, परदेशींना पािठबा देणे म्हणजे गोरगरिबांच्या घरांवर नांगर फिरवण्यासाठी त्यांना पुन्हा निमंत्रण देण्यासारखे आहे. सोन्याची सुरी असली म्हणून ती उरी बाळगायची का, असे साबळे यांनी म्हटले आहे.

Story img Loader