विविध ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चिंचवड देवस्थान तसेच देव घराण्याचा प्रवास विशद केला. या दोहोंशी संबंधित प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांवर तसेच प्रसंगांवर आधारित लघुपट निर्माण होऊ शकतात, ज्यांची ऐपत असेल त्यांनी निश्चितपणे ते करावे, असे आवाहन त्यांनी केले.
चिंचवड देवस्थान, ग्रामस्थ व पिंपरी पालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोरया गोसावी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव महाराज, माधव कोटस्थाने, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शीतल शिंदे आदी उपस्थित होते. पं. अतुलशात्री भगरे गुरुजी व खांडेकरांच्या हस्ते स्वामी विद्यानंद व कुमुदिनी पांडे यांना जीवनगौरव तसेच निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, केशवशास्त्री जोगळेकर, श्रीनिवास जोग, किरण व अंजली कलमदाणी, शरद काळे पाटील, सोपान खुडे, मनोज मोरे, प्रकाश परदेशी, आलोक अवस्थी, हेरंब खोले, सोनाली दातार, जयदेव म्हमाणे आणि ज्ञान प्रबोधनी, निगडी यांना मोरया पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरंदरे म्हणाले, चिंचवड देवस्थानचा तसेच देव घराण्याचा इतिहास अनेकांना माहिती नाही. चिंचवड हे राज्यातील जुने व चांगले कार्य करणारे देवस्थान आहे. योग्यांचे सामथ्र्य मोठे असते व मोरया गोसावी हे योगी होते. मोठय़ा प्रमाणात मोरया उत्सव साजरा करण्याची परंपरा जुनी आहे. विद्यानंद स्वामी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने चांगले आचरण ठेवल्यास माणसाचा उद्धार दूर नाही. सुजाण व सुशिक्षित बनतानाच दोषविरहित जीवन जगा, अहंकार आड येऊ देऊ नका, ईश्वरी प्रेरणेने काम करा, असे आवाहन त्यांनी केले. भगरे यांनी स्त्री भ्रूण हत्येविषयी बोलताना स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत राहिल्यास आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली. प्रास्तविक सुरेंद्र देव यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती म्हाळंक यांनी केले. शैलेश वाघ यांनी आभार मानले.

Story img Loader