विधान परिषदेवर निवडून द्यायच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा २३८० मतांनी विजय केला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सारंग पाटील यांचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना ६१४५३ मते मिळाली तर सारंग पाटील यांना ५९०७३ मते मिळाली.
सोमवारी सकाळपासून या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या फेऱीपासूनचे चंद्रकांत पाटील आघाडीवरच होते आणि शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली आणि ते विजयी झाले. या निवडणुकीतील आणखी एक उमेदावर अरूण लाड यांना ३२ हजार मते पडली.
आणखी वाचा