शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या ‘उद्धव श्री’ पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२ ऑगस्ट) चिंचवडला होणार आहे. मेहर पद्मजी, बाळासाहेब भापकर, हनुमंत गायकवाड, व्ही. एम. मातोरे, सुभाष सिप्पी, पै. विजय गावडे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १५ मान्यवरांचा सत्कार केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे.
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या समारंभास संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, शशीकांत सुतार, डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, चित्रपट सेनेचे प्रमुख आदेश बांदेकर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक बाबासाहेब धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader