पिंपरी पालिकेच्या वतीने चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या तारांगण प्रकल्पासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा सहभाग आहे.
खगोल शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे, मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेनेद, एस. पी. पाठक, महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, शिक्षणाधिकारी एन. टी. कासार यांचाही समितीत समावेश आहे. पालिकेच्या वतीने सहशहर अभियंता प्रवीण तुपे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. मुंबई-पुणे महामार्गालगत अॅटो क्लस्टरसमोर सायन्स पार्क येथे तारांगण उभारणे प्रस्तावित आहे.

Story img Loader