जयंतीपर कार्यक्रमात कार्यकत्यांना आवाहन

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली, आता िपपरी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावणे, हीच खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. अन्यायाविरुद्ध कायम संघर्ष करणाऱ्या मुंडे यांचे विचार पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे खासदार अमर साबळे यांनी या वेळी नमूद केले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त िपपरी शहर भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष जगताप व खासदार साबळे यांनी या भावना व्यक्त केल्या. आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, महेश कुलकर्णी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. जगताप म्हणाले, शहरी तसेच ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांला पक्षकार्यासाठी प्रेरणा देणारे लोकनेते म्हणून मुंडे यांची ओळख होती. पक्षबांधणीसाठी त्यांनी अथक काम केले. खासदार साबळे म्हणाले, राज्यातील १८ कारखाने मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होते. संघर्षांच्या प्रसंगी त्यांनी ऊसतोडणी कामगारांची बाजू घेतली. त्यांनी उपेक्षितांसाठी कायम लढे दिले. सामान्य कार्यकर्त्यांला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याइतपत पात्रता निर्माण करण्याचे कसब मुंडे यांच्यात होते.