पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही या बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आघाडी चा निर्णय घेण्यात येईल, मात्र आम्ही महापालिकेच्या संपूर्ण जागा स्वबळावर लढवू शकतो असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेस देखील ६ जानेवारीला देशात आणि प्रत्येक जिल्ह्यात घेराव घालणार आहे, त्याचबरोबर ८ जानेवारीला महिला घंटानाद आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत संगीतले.यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे, कैलास कदम, विष्णूपंत नेवाळे, आदी उपस्थित होते.