भारत पेट्रोलियमकडून मोबाइलवरून गॅस बुकिंगच्या सुविधा देण्यात आली असली, तरी त्यात सुविधेपेक्षा ग्राहकांना भुर्दंडच अधिक असल्याचे दिसून येत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबत भारत पेट्रोलियमकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित सुविधेसाठी कंपनीने टोल-फ्री क्रमांकांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घरगुती गॅस सिंलिंडरचे बुकिंग करण्यासाठी भारत पेट्रोलियमने ९४२०४५६७८९ हा क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर ग्राहकाने संपर्क साधल्यास बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोबाइल बिलाच्या रूपाने प्रत्येक बुकिंगच्या वेळी ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागतो. ग्राहकांना समाधानपूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने बुकिंगसाठी कंपनीने टोल-फ्री क्रमांक जाहीर केला पाहिजे, अशी मागणी वेलणकर यांनी कंपनीकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Story img Loader