चिंचवड येथे २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या ‘ऑटो अॅन्सीलियरी शो’ चे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी त्याचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास ६६ कंपन्या सहभागी होणार आहेत.
ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक सुविधा व संधी मिळवून देणे, नवीन उद्योजक निर्माण करणे आदी उद्देश असलेला हा शो सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत खुला राहणार आहे. ‘आयटीपीओ’ व ‘एसीडीआरआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या हेवी इंडस्ट्रीज व मिनीस्टरी ऑफ कॉमर्सचे सहकार्य लाभले आहे. या वर्षी झारखंड हे ‘पार्टनर स्टेट’ तर तामिळनाडू हे ‘फोकस स्टेट’ तर महाराष्ट्र ‘निमंत्रित राज्य’ म्हणून कार्यरत राहणार आहे.

Story img Loader