पुण्यात अनेकविध उपक्रमांनी मंगळवारी पर्यटनदिन साजरा झाला. या पाश्र्वभूमीवर पुण्याच्या पर्यटन क्षेत्राचे वास्तविक चित्र काय आहे, याचा आढावा..

पिंपरी-चिंचवडच्या सुशोभीकरणासाठी तसेच शहराला ‘पर्यटननगरी’ करण्यासाठी महापालिकेने नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली होती. मात्र, अर्थकारण, राजकारण आणि एकेक अडचणी निर्माण होऊ लागल्याने ‘पर्यटननगरी’ म्हणून उदयास येण्यासाठी शहराला आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार

पिंपरी-चिंचवड शहरात दुर्गादेवी उद्यान, वॉटर पार्क, भोसरी तळे उद्यान, बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान, केजुदेवी बोट क्लब, शाहूनगर आणि पिंपळे गुरव उद्यान, महापालिकेचे विविध प्रकल्प आदी पर्यटनस्थळे म्हणता येतील, अशी ठिकाणे आहेत. संपूर्ण शहरच पर्यटननगरी व्हावे, या हेतूने महापालिकेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी िपपरी-चिंचवडचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार, शहरातील प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरले. मुंबईतील वास्तुविशारदाला कामही देण्यात आले. या कामासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन होते. मात्र, प्रकल्पाच्या खर्चाचे मोठे आकडे दिसू लागल्याने वेगळेच ‘अर्थकारण’ सुरू झाले. लोकप्रतिनिधी टक्केवारीचे गणित मांडू लागले. अधिकारी प्रकल्प आपल्याकडे यावेत, यासाठी प्रयत्न करू लागले. शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या या पर्यटन आराखडय़ाचे तीन तेरा वाजले. परिणामी, एकात्मिक विकासाचे पर्यटन धोरण बदलून त्यातील कामे वेगळी करण्यात आली व प्रकल्पाचे टप्पे निश्चित करण्यात आले.

त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, चिंचवड स्टेशन येथे रेल्वे स्थानक परिसरात ‘वॉर्ड सेंटर’ उभारणे, ‘सायन्स पार्क’समोर तारांगणची उभारणी, आकुर्डी-प्राधिकरणात बहुउद्देशीय दुहेरी नाटय़गृहाची बांधणी, संभाजीनगर येथे ‘मॉडेल वॉर्ड’ विकसित करणे आणि भोसरीच्या गवळी माथा येथे ‘बालनगरी’ची उभारणी ही कामे ठरवण्यात आली. त्यासाठी १०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील सहा कामे मार्गी लागणार असली, तरी अन्य पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी महापालिकेकडे सध्या निधी नाही. अनेक ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुरेसा निधी व जागा ताब्यात आल्याशिवाय पर्यटनाचा गाडा पुढे सरकरणार नाही आणि तोपर्यंत शहरवासीयांना पर्यटननगरीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.