शास्त्रीय संगीतातील रागांच्या गुणवैशिष्टय़ांवर आधारित ‘रुषित रागाज कलेक्शन’ ही अत्तरांची निर्मिती आनंद प्रताप जोग आणि डॉ. मंदार लेले यांनी केली आहे. संगीत आणि गंध ही अनन्वय कल्पना प्रत्यक्षात आणली असून ललत, बिलावल, सारंग, मुलतानी, मारुबिहाग, हंसध्वनी, चंद्रकंस, बहार आणि दरबारी या नऊ रागांची अत्तरे तयार करण्यात आली आहेत. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते अत्तरांच्या मालिकेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्रसिद्ध गायक आनंद भाटे आणि निवेदक आनंद देशमुख या प्रसंगी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर गुरुवारपासून (१२ डिसेंबर) सुरू होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये ही अत्तरे उपलब्ध होणार असल्याची माहिती जोग आणि लेले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader