सतीश पाकणीकर यांनी काढलेल्या प्रकाशचित्रांचे ‘व्ह्य़ूफाईंडर’ प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन २८ सप्टेंबर रोजी डॉ. अनिल अवचट आणि डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे. तसेच या वेळी पाकणीकर यांनी लिहिलेल्या ‘भिंगलीला’ या पुस्तकाचे प्रकाशनही केले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध स्मारके, जाहिरात, उद्योग, अन्न, निसर्गचित्र अशा विविध विषयांवरील १८० प्रकाशचित्रांचा समावेश आहे. ‘भिंगलीला’ या पुस्तकामध्ये ग्युस्ताव्ह ल ग्रे, सेसिल बिटन, लाला दीनदयाळ यांसारख्या महत्त्वाच्या अशा २२ प्रकाशचित्रकारांची माहिती आणि त्यांची प्रकाशचित्रे दिलेली आहेत.

Story img Loader