महापौरांना सक्तीची राजकारण निवृत्ती ?

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वक्षीय दिग्गज नेते आपले भवितव्य पुन्हा आजमावून पाहण्यासाठी ‘लक्ष्य २०१७’ च्या राजकीय आखाडय़ात उतरण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. खासदार झाल्यामुळे श्रीरंग बारणे तसेच आमदार झाल्यामुळे महेश लांडगे व गौतम चाबुकस्वार यंदा िरगणात असणार नाहीत. भाजप-राष्ट्रवादीत सँडविच झाल्याने शहराच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यावर सक्तीची राजकारण निवृत्ती घेण्याची वेळ येते की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

ज्येष्ठ माजी महापौर आर. एस. कुमार यंदा भाजपच्या उमेदवारीवर लढण्याच्या तयारीत आहेत. माजी महापौर योगेश बहल पुन्हा राजकीय आखाडय़ात आहेत. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादीच्या वाटेवर असून पुन्हा िरगणात राहणार आहेत. पक्षनेत्या मंगला कदम यांनी मुलाला राजकारणात आणण्याचे प्रयत्न चालवले असून त्या स्वतही लढतील, अशी शक्यताही आहे. स्वीकृत नगरसेवक हनुमंत गावडे यांनीही स्वतऐवजी मुलासाठी प्रयत्न चालवले आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर यांनी यंदा पत्नीला राजकारणात आणण्याचे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीत यश न मिळालेल्या शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह शहरप्रमुख राहुल कलाटे पालिका निवडणुकीत भवितव्य आजमावून पाहणार आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे निवडणुकीच्या िरगणात असणार आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी यांचे जातीच्या दाखल्यामुळे नगरसेवकपद रद्द झाले होते. यंदा ते पुन्हा लढण्यास उत्सुक आहेत. श्रीरंग बारणे नगरसेवक असताना थेट खासदार झाले. त्यामुळे यंदा ते निवडणुकीच्या िरगणात असणार नाहीत. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष ते आमदार असा प्रवास पूर्ण करणारे महेश लांडगे तसेच नगरसेवक, उपमहापौर ते आमदार असा प्रवास करणारे गौतम चाबुकस्वार सभागृहात असणार नाहीत. माजी आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी व मुलगा विक्रांत एकाच वेळी निवडणूक लढतील, अशी चिन्हे आहेत. खासदार अमर साबळे यांचे मुलीसाठी तर माजी आमदार अण्णा बनसोडे यांचे पत्नीला राजकारणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर आझम पानसरे याही वेळी स्वत निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, मुलगा निहालसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रपिंाइं नेत्या चंद्रकांता सोनकांबळे भाजपच्या की रपिंाइंच्या चिन्हावर लढणार, हीच उत्सुकता आहे. याशिवाय, अनेक माजी महापौरांना पुन्हा निवडून येण्याचे वेध लागले असल्याने ते निवडणूक िरगणात आहेत.

Story img Loader