पिंपरी-चिंचवड परिसरातील पालिकेच्या १२ जलतरण तलावातील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या परिसरात असणाऱ्या प्रत्येक जलतरण तलावामध्ये केवळ दोनच जीवरक्षक असल्याचे समोर आले असून पालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्यातून उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडसह अवघ्या महाराष्ट्राचे तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बच्चे कंपनीसह अनेक घरातील कुटुंबियांची पावले ही जलतरण तलावाच्या दिशेने वळतात.

पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या १२ जलतरण तलावावर फक्त २४ जीवरक्षक असल्यामुळे पालिका प्रशासन नागरिक आणि बच्चेकंपनीच्या जीवाशी खेळ खेळत आहे, असेच चित्र सध्या पाहायला मिळते. नियमानुसार, पोहण्यासाठी येणाऱ्या पंचवीस व्यक्तीच्यामागे एक जीवरक्षक असणे अनिवार्य आहे. मात्र, चिंचवडमधील संभाजी नगर येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या तब्बल शंभर ते दीडशे व्यक्तीच्या मागे केवळ दोन जीवरक्षक आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून हा तलाव सुरू करण्यात आला आहे. या तलावात महिन्याभरात ३० ते ३५ जणांना बुडताना जीवरक्षकांनी वाचवले आहे.  मे महिना सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी तब्बल शंभर  ते दीडशे नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. जीवरक्षक मात्र दोनच आहेत.  या जलतरण तलावाशिवाय शहरातील पालिकेच्याच अन्य ठिकाणी असणाऱ्या ११ जलतरण तलावरही असाच भोंगळ कारभार असल्याचे समोर आले आहे.

Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?

शहरात एकुण महापालिकेचे १२ जलतरण तलाव आहेत. एका तलावात रोज सकाळी चार आणि सायंकाळी चार अशा आठ बॅच तयार करण्यात आल्या आहेत. एका बॅचमध्ये शंभरपेक्षा अधिक व्यक्ती पोहण्यासाठी येतात. याप्रमाणे एका तलावात रोज एक हजारहुन अधिक म्हणजेच १२ तलावात १२ हजारहुन अधिक व्यक्ती पोहायला येतात. या १२ हजारहुन अधिक व्यक्तींचा जीव केवळ २४ जीवरक्षकांच्या हातात आहे. शहरवासीयांच्या जीवाशी असा खेळ सुरु असताना पालिका अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहेत. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी तर कोणी मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी जलतरण तलावात पोहायला येत आहेत. मात्र, येथे त्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. हा खेळ जीवरक्षक वाढवल्याशिवाय थांबणार नाही.  जलतरण तलावाच्या  या परिस्थितीबाबत क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी प्रतिक्रिया दिली. पानसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रत्येक जलतरण तलावाच्या ठिकाणी दोन जीव रक्षक नेमण्यात आले आहेत. जलतरण तलावावर वाढणारी लोकसंख्या पाहता नियमानुसार,  या ठिकाणी जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात टेंडर काढले असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.