‘महावितरण’कडून राज्यभर लावण्यात येत असलेल्या अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रा रेड (आरआय) या वीजमीटरची गुजरातच्या वीज मंडळानेही दखल घेतली आहे. पुण्यात लावण्यात आलेल्या या मीटरची पाहणी गुजरात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली.
गुजरात वीज निगमचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीवास्तव यांनी पर्वती विभागातील मंडई उपविभागाला भेट दिली. लघुदाब ग्राहकांकडे लावण्यात आलेल्या रेडिओ फ्रिक्वेंसी मीटरची त्यांनी पाहणी केली व या मीटरच्या कार्यप्रणालीचीही माहिती त्यांनी घेतली. ‘महावितरण’च्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर, रास्ता पेठ मंडलाचे अधीक्षक अभियंता अंकुश नाळे, उपमहाव्यवस्थापक (आयटी) योगेश खैरनार, कार्यकारी अभियंता सुनील पावडे, सहाय्यक अभियंता ए. बी. बनसोडे आदी त्या वेळी उपस्थित होते.
मानवी हस्तेक्षेपाशिवाय हॅड हेल्ड युनिटच्या माध्यमातून या मीटरमधून रिडिंग घेता येते. त्याचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखविण्यात आले. पुणे विभागामध्ये सध्या चार लाख आठ हजार ३८९ आरएफ व आयआर मीटर लावण्यात आले आहेत.
अत्याधुनिक वीजमीटरची गुजरात वीजमंडळाकडून दखल
‘महावितरण’कडून राज्यभर लावण्यात येत असलेल्या अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रा रेड (आरआय) या वीजमीटरची गुजरातच्या वीज मंडळानेही दखल घेतली आहे.
आणखी वाचा
First published on: 25-10-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radio frequency and infra red mseb meters noticed by gujarat power mandal