मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आता रविवारीही रात्री दहापर्यंत संगणकीय आरक्षण सुरू ठेवण्याची विशेष सुविधा १६ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.
पुणे विभागातील रेल्वे आरक्षण केंद्रामध्ये यापूर्वी रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत आरक्षण केंद्र सुरू ठेवण्यात येत होते. दुसऱ्या पाळीमध्ये रविवारी आरक्षण केंद्र बंद ठेवण्यात येत होते. प्रवाशांची गरज लक्षात घेता आता प्रत्येक रविवारीही सकाळच्या पाळीबरोबरच दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आरक्षण केंदं्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. पुणे स्थानकावर खिडकी क्रमांक २८, २९ व ३० या ठिकाणी आरक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. रविवारी या विशेष सुविधेचे उद्घाटन होणार आहे.

Story img Loader