पावसाने उघडीप न घेतल्याने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर संततधार राहिली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग बराच मंदावला. पावसामुळे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता, त्यामुळे नागरिकांची सुटीच्या दिवशी गैरसोय झाली.
शनिवारी दिवसभर पाऊस होता. रविवारीही तो सुरूच राहिला. सकाळपासून संततधार सुरू राहिली. त्यामुळे नागरिकांनी सुटीच्या दिवशी घराबाहेर न पडता आराम करणेच पसंत केले. शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. रस्त्यांवर पाणी साचल्याने तसेच वाहतुकीचे दिवे बंद पडल्याने शहरातील वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. संध्याकाळी अधिक संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने कोंडीत भरच पडली.

Story img Loader