पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शिवसेनेने काळेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यासंदर्भात, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना भेटून पावसाळ्यात नागरिकांना बेघर करू नका, अशी मागणी खासदार गजानन बाबर यांनी केली.
प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे. त्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. वर्षांनुवर्षे नागरिक त्या ठिकाणी राहत असून त्यांना ऐन पावसाळ्यात बेघर करू नका, अशी मागणी बाबर तसेच सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, मोहन गुरव आदींनी डॉ. म्हसे यांच्याकडे केली. तत्पूर्वी, सकाळी दहापासून आंदोलकांनी काळेवाडी येथे निदर्शने केली. दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तेव्हा पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी बाबर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, डॉ. म्हसे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बाबर यांना प्राधिकरण कार्यालयात आणण्यात आले. तेव्हा झालेल्या चर्चेत शिवसेनेने संबंधित नागरिकांची बाजू मांडली. राज्यशासनाला तुमच्या भावना कळवू, असे आश्वासन म्हसे यांनी शिष्टमंडळाला दिले.
प्राधिकरण कारवाईच्या विरोधात शिवसेनेचा काळेवाडीत ‘रास्ता रोको’
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शिवसेनेने काळेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले.
First published on: 16-07-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta roko by shivsena in kalewadi