पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी, वाहन चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याकडून तब्बल १२ लाख २ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. घरफोडी करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली असून निखिल कंगणे असं या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या निखिल कंगणे हा (रा. मोरेवस्ती, चिखली) घरात कोणी नसताना दरवाजाचk कडीकोंडा उचकटून तो चोरी करायचा. पोलिसांनी सापळा रचून निखिलला अटक केली. त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात १६ गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून तब्बल १२ लाख २ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यात सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस याचा समावेश आहे.

Story img Loader