पिंपरी पालिकेच्या ‘सारथी हेल्पलाईन’ला ‘जस्ट डायल’ या स्थानिक माहिती पुरवणाऱ्या कंपनीने पाचपैकी ४.४ गुण दिले आहेत. ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५२ हजार नागरिकांनी तिचा लाभ घेतला आहे.
आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या हेल्पलाईनला (८८८८००६६६६) अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळला. १५ ऑगस्ट ते २४ नोव्हेंबर या दरम्यान १५ हजार दूरध्वनी आले आहेत, वेबसाईटद्वारे ३६ हजार जणांनी माहिती घेतली. मोबाईल अॅप्सद्वारे २८९३ नागरिकांनी माहिती डाऊनलोड केली आहे. पालिकेच्या सेवासुविधा विषयक विविध प्रकारची माहिती विचारणारे नऊ हजार, तर तक्रारीबाबतचे पाच हजार दूरध्वनी आले आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.

Story img Loader