पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वाहनावर गेल्या तीन दिवसांपासून नाही. या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी गुरुवारी त्यांनी चक्क ट्रॅक्टरमधून पालिकेत एन्ट्री केली. पालिकेच्या प्रवेश द्वाराजवळ अचानक आलेल्या टॅक्टरमुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.   सस्ते यांना पालिकेची मोटार आहे, पण चालक नसल्यानुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने दिलेल्या वाहनावर चालक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.

सोमवारी त्यांना रिक्षातून पालिकेत यावे लागले होते. यावेळी त्यांच्या रिक्षाचा अपघात देखील झाला. पण त्यातून ते सुखरुप बचावले. प्रशासनाकडून सभापतींना दिल्या जाणाऱ्या सुविधेकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टरवरुन आलेल्या सभापतींना सुरक्षा रक्षकांनी अडवले. मात्र थोड्यावेळाने त्यांना पालिका परिसरात प्रवेश देण्यात आला.
याविषयी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. पालिकेने दिलेल्या वाहनावर चालक नसल्याने कोणत्याही कार्यक्रमाला जाता येत नसल्याची खंत सस्ते यावेळी त्यांनी  व्यक्त केली.

Story img Loader