पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांची दिशाभूल करत असून ती त्यांनी तातडीने थांबवावी तसेच शासनाने लावलेला दुप्पट शास्तीकर रद्द करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केली आहे. शहरातील बांधकामे अधिकृत करण्याची नुसतीच आश्वासने बाबा, दादा दोन वर्षांपासून देत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही करत नाहीत. या विषयावर त्यांनी राजकारण करू नये. पोकळ घोषणा करण्यापेक्षा त्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी. जनतेची अशीच फसवणूक सुरू ठेवल्यास आगामी निवडणुकांमध्ये जनता चोख प्रत्युत्तर देईल, असे खाडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘बाबा’- ‘दादा’, पिंपरीतील नागरिकांची दिशाभूल थांबवा – सदाशिव खाडे
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांची दिशाभूल करत असून ती त्यांनी तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केली आहे.
First published on: 17-02-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop misguiding sadashiv khade criticise cm and ajit pawar