पिंपरी पालिकेत ‘ई टेंडिरग’ पद्धती लागू करण्यास तीव्र विरोध झाला होता. त्याचा काही काळ त्रासही झाला. मात्र, नंतरच्या काळात त्यामुळे होणारे फायदे लक्षात आले. त्याचा मोठय़ा प्रमाणात पालिकेला आर्थिक फायदा झाल्याचे माजी आयुक्त व सध्याचे ‘महाजनको’ चे व्यवस्थापकीय संचालक आशिष शर्मा यांनी सांगितले.
पिंपरी पालिका व यशदा आयोजित कार्यशाळेत शर्मा बोलत होते. पिंपरीत चार वर्षे आयुक्त म्हणून कारकीर्द केलेल्या शर्मानी या काळात आलेले कटू-गोड अनुभव सांगितले. ते म्हणाले, आयुक्त म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी अधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. योग्य नियोजन व व्यवस्थापन करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. अभियंत्यांनी ‘एमबी रेकॉर्िडग’ करण्यासाठी संगणकाचा वापर करावा, याची सक्ती केली. पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही हा निर्णय घेऊन प्रशासनात ‘ई गव्र्हनन्स’ चा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पारदर्शकता आली व त्यातून पालिकेचे हित जोपसले गेले. जन्माचे ऑनलाइन दाखले, बांधकाम परवानगी, करसंकलन आदी विभागात ई गव्र्हनन्सचा प्रभावी वापर केला. आपण ई गव्र्हनन्सचा सेवाप्रारंभ केला. मात्र, डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्याचा वापर अधिकाधिक नागरिकांना व्हावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. नागरी व्यवस्थापनात नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवासुविधा उपलब्ध साधनसामुग्री आणि सक्षम व्यवस्थापन हे तीन घटक महत्त्वाचे आहेत.

Story img Loader