महाविद्यालयांकडून निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र घेणार

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारनोंदणीची विशेष मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बारावीचे निकाल लागून सध्या पदवी अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतानाच मतदारनोंदणी केली जाणार आहे. तसेच शंभर टक्के मतदारनोंदणीसाठी महाविद्यालयांकडून निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र घेणार आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शहर आणि जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये १८ ते २१ वयोगटातील नवमतदारांसाठी मतदारनोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नमुना अर्ज ६ भरून घेतले जात आहेत. विशेष मतदारनोंदणी मोहीम २२ जुलपर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्य़ातील १२२ महाविद्यालयांमध्ये देखील मतदारनोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबरोबरच मतदारनोंदणी करून घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांची मतदारनोंदणी यापूर्वीच झालेली असेल त्याची माहिती प्रवेश अर्जाबरोबर जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नावनोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्येच निवडणूक ओळखपत्र मिळणार असून मतदारनोंदणीबाबत गुरुवारी (१३ जुलै) शहर आणि जिल्ह्य़ातील महाविद्यालये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ यांच्या प्राचार्याबरोबर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

आतापर्यंत १ हजार ३९८ युवक आणि १ हजार १७९ युवती अशी एकूण २ हजार ५७७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

शहर आणि जिल्ह्य़ामधील २३ मतदारसंघांमध्ये मतदारनोंदणी करता येणार आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या मतदारसंघनिहाय मतदारनोंदणी करता येणार आहे. २१ वर्षांवरील मतदारांसाठी देखील नमुना अर्ज ६ भरून मतदारनोंदणी करता येणार आहे. मात्र, त्यांच्या माहिती संकलनाचे काम ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे.

शहर आणि जिल्ह्य़ातील २३ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारनोंदणी मोहीम सुरू आहे. तसेच जिल्ह्य़ातील १२२ महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश प्रक्रियेबरोबरच मतदारनोंदणी करून घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी परराज्यातील आहेत, त्यांना ‘ऑनलाइन’ नोंदणी करण्याची मुभा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून मतदारनोंदणी संदर्भात प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. महाविद्यालयनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते मतदारनोंदणीचा आढावा घेतील.

मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Story img Loader