Ninav Barfi Recipe In Marathi: उन्हाळा हा सुट्ट्यांचा सीझन असतो. या तीन महिन्यांच्या काळात मुलांना सुट्ट्या असतात. सुट्टी असल्याने ती आजोळी जात असतात. मुलांसह नोकरदार मंडळीही सुट्ट्या घेऊन कुटूंबासह वेळ घालवताना दिसतात. उन्हाळ्यामध्ये लग्नसभारंभाच्या निमित्ताने नातेवाईक घरी येत असतात. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. अशा वेळी घरातील गृहिणी सर्वांसाठी काहीतरी खास बनवायचा विचार करत असतात. तुमच्या मनात सुद्धा असा विचार येत असेल, तर तुम्ही घरच्या घरी ‘निनाव’ बर्फी’ बनवू शकता.
साहित्य –
- बेसन १ वाटी
- गव्हाचे पीठ अर्धी वाटी
- गूळ १ वाटी बारीक चिरलेला. (गोड आवडत असल्यास दीड वाटी घ्या)
- नारळाचे दूध ३ वाट्या
- साजूक तूप अर्धी वाटी
- केशर आणि वेलची पूड आवडीप्रमाणे
कृती –
- प्रथम बेसन आणि गव्हाचे पीठ नीट एकत्र करून घ्या.
- तुपावर ही पिठं खमंग भाजून घ्या आणि थंड करा.
- नारळाच्या दुधात गूळ विरघळवून घ्या.
- त्यात केशर आणि वेलची पूड घाला.
- हे नारळाचे दूध भाजलेल्या पिठामध्ये हळूहळू गुठळ्या होऊ न देता घाला.
- गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
- चांगले घट्ट झाल्यावर बेकिंग पॅनला तुपाचा हात लावून त्याच्यावर नीट पसरवा.
- वरून थोडेसे तूप सोडा. १८० -अंश सेल्सियसला २०-२५ मिनिटे बेक करा.
- वरून खरपूस होईपर्यंत ठेवा. थंड झाल्यावर वड्या पाडून सर्व्ह करा.