ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे गुरुवारी खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.
काँग्रेसच्या राजवटीत मुंबईसह देशात अतिरेकी हल्ले, रेल्वेगाड्या, बसगाड्या व अन्य सार्वजनिक ठिकाणी बाँबस्फोट होत होते. त्यावेळी मुंबईकरांवर भीतीचे सावट होते.
भाजपचे अनेक उत्साही कार्यकर्ते टोप्या परिधान करुन मंडपाकडे जात असताना महिलांनी घातलेल्या नरेंद्र, देवेंद्र तसेच भाजप लिहिलेल्या टोप्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या.
काँग्रेसचा आरक्षणविरोध हा अलीकडचा नाही, तर खूप जुना आहे. आज दलित, आदिवासी, भटके, ओबीसींची होत असलेली एकजूट काँग्रेसच्या ‘शाही परिवारा’साठी डोकेदुखीची ठरली आहे.