Apple ही एक टेक कंपनी आहे. ही कंपनी आयफोन, मॅकबुक, स्मार्टवॉच आणि अन्य गोष्टींचे उत्पादन करते. Apple ने आपल्या ग्राहकांसाठी iPhone 14 Pro मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. फुरसत नावाची शॉर्ट फिल्म कंपनीची iPhone 14 Pro वर शूट करण्यात आलेली पहिली भारतीय फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचा कालावधी हा ३० मिनिटांचा आहे. या शॉर्ट फिल्मचे दिगदर्शन हे विशाल भारद्वाज यांनी केले आहे.

या शॉर्टफिल्ममुळे अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक हे बॉलिवूड चित्रपट दिगदर्शक विशाल भारद्वाज यांचे चाहते बनले आहेत. विशाल भारद्वाज यांनी नुकतेच आयफोन १४ प्रो मधून फुरसत नावाच्या शॉर्टफिल्मचे शुटिंग केले आहे. या शॉर्ट फिल्मचे टीम कुक यांनी कौतुक केले आहे. तसेच वविशाल भारद्वाज यांच्या ‘सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी’ देखील कौतुक केले आहे. ही शॉर्ट फिल्म नुकतीच युट्युबवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ईशान खट्टर आणि वामिका गब्बी यांनी काम केले असून त्यांनी निशांत नावाच्या माणसाची कथा यामध्ये मंडळी आहे. जो एका प्राचीन अवशेषाच्या मदतीने भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त करतो.

हेही वाचा : स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा…

ही शॉर्टफिल्म iPhone 14 Pro वर शूट करण्यात आली आहे. यामध्ये काही प्रभावी शॉट्स आणि सीन्स आहेत जे प्रेक्षकांना शॉर्टफिल्म बघण्यासाठी प्रेरित करतील. सीईओ टीम कुक देखील ही फिल्म बघून आश्चर्यचकित झाले. त्यांनी याची एक लिंक ट्विटरवर शेअर केली आहे.

टीम कुक यांची प्रतिक्रिया

या शॉर्ट फिल्मबद्दल टीम कुक म्हणतात की, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची ही सुंदर अशी शॉर्ट फिल्म पहा , जी भविष्यात काय घडू शकते याचा शोध घेते. यामध्ये अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी करण्यात आली आहे.

टीम कुकच्या ट्विटला उत्तर देताना चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी लिहिले की, या कौतुकामुळे मी भारावून गेलो आहे. या संधीसाठी Apple चे धन्यवाद. अशा पद्धतीने विशाल भारद्वाज यांनी टीम कुक यांचे आभार मानले आहेत.