स्मार्टफोन मार्केटमध्ये फोल्डेबल फोन आणून सॅमसंगने आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे नाही. नवीन करण्याची धमक असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, यामध्ये इतर स्मार्टफोन कंपन्या देखील मागे नाहीत. हे तंत्रज्ञान ग्राहकांना पसंत येईल आणि ते टिकेल असा विश्वास असल्याने त्यांनीही फोल्डेबल फोन मार्केटमध्ये लाँच केले आहेत. आघाडीची स्मार्टफोन कंपनी व्हिवोने ग्राहकांसाठी Vivo X Fold + हा फोन लाँच केला आहे. कंपनीने या अगोदर व्हिवो एक्स फोल्ड लाँच केला होता.

Vivo X Fold च्या तुलनेत या फोनमध्ये मोठी बॅटरी आहे, आणि अपडेटेड प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन वेगाने काम करावे यासाठी हा प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अधिक काळ चालावा यासाठी त्यात ४ हजार ७३० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन ८० वॉटची चार्जिंग आणि ५० वॉटची वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो.

(तुम्ही व्होडाफोन आयडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच… तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता)

हे आहेत फीचर

फोनच्या आत ८.०३ इंचचा अमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यातून २ के रेझोल्युशन मिळते. तर मेन स्क्रिन ६.५३ इंचची आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. फोनला मागे ४ कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यातील प्रमुख कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. ४८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, १२ मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आणि ८ मेगापिक्सेलचा पेरिस्कोप कॅमेरा मिळतो.

फोनच्या दर्शनी भागात १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्य इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हँडसेट ड्युअल सिम सपोर्ट आणि ५ जी कनेक्टिव्हिटिसह येतो.

(आता मनसोक्त लिहा, फोटो काढा, सॅमसंगच्या ‘या’ 5 G फोनवर मिळत आहे ३२ हजारांची मोठी सूट, हे केल्यास अजून बचत होईल)

इतकी आहे किंमत

१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा फोन १ लाख १५ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेला फोन १ लाख २५ हजार रुपयांमध्ये मिळतो. पण कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. मात्र, भविष्यात हा फोन भारतातही लाँच होऊ शकतो.