ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकांत फेरीवाले वाढले; पादचारी, प्रवाशांना त्रास
कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज मुंबईकडे ये-जा करत असतात. या प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो, तो स्थानकातील फेरीवाल्यांचा. या तीनही स्थानकांबाहेरील रस्त्यावर, पुलावर, स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा वेढा असतो. आधीच ट्रेनच्या गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना स्थानकात उतरल्यानंतर या फेरीवाल्यांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडते. फेरीवाल्यांच्या जाचातून सुटका करावी, अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.

महापालिकेकडून फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई केली जाते. पण कारवाईची माहिती फेरीवाल्यांना मिळाल्यावर ते तेथून पळून जातात. कारवाई करणारे अधिकारी परत आल्यावर फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. आता आम्ही स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे सामान उचलणारी गाडी आणि मार्शल कायमस्वरूपी ठेवणार आहोत.
– संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका.

Western Railway block
Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Kharkopar to Uran railway line, Cleaners employment,
स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
badlapur rail roko local Diversion
Badlapur Protest : बदलापूरच्या आंदोलनाचा मुंबई लोकल व एक्सप्रेसला फटका, रेल्वेगाड्या ‘या’ मार्गावर धावतायत, मुंबईकरांसाठी काय व्यवस्था?
Sawantwadi Road Terminus, Deepak Kesarkar,
सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी, आंदोलनाला मंत्री दिपक केसरकरांचा प्रतिसाद
18 special trains of Central Railway will run on consecutive holidays
सलग सुट्ट्यांनिमित्त मध्य रेल्वेच्या १८ विशेष रेल्वेगाड्या धावणार
Diva-CSMT local, Konkan, Diva, protest,
दिवा-सीएसएमटी लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन, कोकणातील रेल्वेगाड्यांना दिवा येथे थांबा द्या

ठाणे स्थानक
ठाणे पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर पावलोपावली फेरीवाल्यांचा वेढा जाणवतो. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेर नव्याने उघडलेल्या तिकीट केंद्राभोवती फेरीवाले आणि गर्दुल्ले यांचा सर्रास वावर असतो. तिकीट काढण्यासाठी असलेल्या गर्दीमुळे नेहमीच्या प्रवाशांना वाट काढत जावे लागते. फेरीवाल्यांनी आपल्या पथाऱ्या निर्धास्तपणे पसरल्या असतात. सकाळच्या वेळी विविध वस्तू विकणारे फेरीवाले आणि रात्रीच्या वेळी चहापासून पावभाजी-बुर्जीपाव विकणाऱ्या फेरीवाल्यापर्यंत सर्वाचा मुक्त वावर असतो. विशेष म्हणजे इथे महापालिकेची गाडी उभी असूनही त्याचा कोणताही परिणाम होत नाही. एखाद दिवशी कारवाई होणार असली, तर त्याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळते. कारवाई करणारे अधिकारी गेले की, फेरीवाले आपले बस्तान पुन्हा बसवतात.

डोंबिवली स्थानक
डोंबिवली पश्चिमेला काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकालगत झेरॉक्सपासून अनेक छोटे छोटे स्टॉल होते. मात्र सध्या हे स्टॉल काढण्यात आले आहेत. मुंबईच्या दिशेला स्थानकात शिरताना काही सरबतवाले वाट अडवतात. पण अन्य अडथळा जाणवत नाही. त्याची कसर स्कायवॉकवर भरून निघते. स्कायवॉक स्थानकातील पादचारी पुलाला लागेपर्यंत फेरीवाले दोन्ही बाजूला बसलेले असतात. हीच गत कल्याण दिशेकडील स्कायवॉकची. डोंबिवली पूर्वेला मात्र फेरीवाल्यांचा विळखा जास्त आहे. येथे जिन्यावरही फेरीवाले बसलेले आढळतात. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीतील प्रवाशांना मोकळा मार्ग उपलब्ध नाही.

कल्याण स्थानक
कल्याण पश्चिमेला स्थानकाबाहेर रिक्षा आणि इतर गाडय़ांसाठी मोकळी जागा आहे. त्यामुळे येथे फेरीवाल्यांचा जाच कमी आहे. मात्र रेल्वेच्या हद्दीबाहेर पुन्हा फेरीवाले मोठय़ा प्रमाणात आढळतात. तिकीट खिडकीच्या येथे फेरीवाल्यांविरोधात कारवाई आणि दंडाचा फलक लावला आहे. पण ही कसर कल्याणमधील फेरीवालेही पादचारी पूल आणि स्कायवॉकवर भरून काढतात. मुंबई दिशेकडील स्कायवॉकवर दुतर्फा फेरीवाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे.

फेरीवाले काय काय विकतात?
या फेरीवाल्यांकडे साधारणपणे सरबते, मोबाइल कव्हर, मोबाइल चार्जर, मोबाइलसंबंधित अन्य वस्तू, चामडय़ाचे पट्टे, टीशर्ट, खेळणी, चामडय़ाचे स्वस्तातले बूट, डिओड्रंट, पुस्तके, खाद्यपदार्थ, की-चेन आदी.
रोहन टिल्लू / संकेत सबनीस, मुंबई