मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे याच दिवशी मनसेकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

यासंबंधी बोलताना मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, “मुळात हा विषय ईडीचा नसून ईव्हीएमचा आहे. १५ वर्ष ईडीला का नाही कळलं ? राज ठाकरे ज्याप्रकारे ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत याचा सरकारला त्रास होत आहे. हा सगळा दबावतंत्रांचा भाग आहे”.

Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…
mira bhayandar, Navi Mumbai,
नवी मुंबई, मिराभाईंदरमध्ये नाराजी तर, ठाण्यात मात्र दिलजमाई
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही

“जर राज ठाकरेंना खरंच बोलावलं गेलं तर महाराष्ट्रभर किंबहुना मुंबईत जे काही होईल त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या पाठी त्यांचा कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मनसे नेते अभिजीत पानसे यांनी हा गळचेपीचा प्रकार असून महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही असं सांगत महाराष्ट्राने राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.