भाजपचे आमदार राज पुरोहित यांच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या स्टिंग व्हिडिओनंतर विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मार्गांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. पुरोहित यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर टीका केल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पुरोहितांच्या कामगिरीचे कौतुक करणारे बॅनर्स ठाणे शहरात लावले आहेत. “आम्ही जे बोलू शकलो नाही, ते तुम्ही बोलून दाखवले. मर्द राज पुरोहितांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज पुरोहित तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.” असा मजकूर या बॅनर्सवर झळकत आहे. भाजपचे नेते मोदी आणि अमित शहा यांचे कितीही तोंडदेखले कौतूक करत असले तरी प्रत्यक्षात नेत्यांमध्ये नेतृत्वाविषयी असणारी नाराजी पुरोहित यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली होती. त्यामुळे आम्हाला जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवलेत असे सांगत आव्हाड यांनी भाजपला चांगलाच टोला हाणला आहे.

Story img Loader