सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट शेअर केली की, ती लगेचच व्हायरल होते. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या काही पोस्ट या सर्वच वयोगटातील युजर्संना रिलेट करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्र चित्रपटातील केसरीया Kesariya – Brahmāstra हे गाणं तुम्ही आतापर्यंत फक्त मराठीत एकलं असेल. मात्र आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील एक तरुण हे गाणं ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये गात आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना प्रचंड आवडला असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊंटवरून शेअर केला आहे.

५ वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलं ‘केसरीया’ गाणं –

Kesariya – Brahmāstra या व्हिडीओमध्ये दिसत असलेला तरुण ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरीया गाणे पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना दिसत आहे. त्याने मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदीमध्ये केसरीया हे गाणे गायले आहे. व्हिडिओतील व्यक्तीचे नाव स्नेहदीप सिंग कलसी असे आहे. याने याआधीही बरीच गाणी गायली आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये “एक पंजाबी मुलगा मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदीमध्ये केसरिया गातो. मला माहित नाही की मला दक्षिणी भाषा किती चांगल्या प्रकारे माहित नाही पण एकायला छान वाटते. असं त्यांनी लिहलं आहे. तसेच अधिक भाषा शिकणे ही एक सुंदर गोष्ट असल्याचंही ते म्हणतात.

आनंद महिंद्रा ट्वीट (Anand Mahindra Tweet) पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video : असावी सुंदर चॉकलेटची कार…’या’ चॉकलेट कारची इंटरनेटवर सुसाट एन्ट्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ आनंद महिंद्राच नाही तर सर्वांनाच हा व्हिडिओ आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरनं लिहलं की, भावनिकदृष्ट्या हलवणारे असं हे गाणं आहे, मला या सर्व भाषा समजतात, त्यामुळे हा व्हिडीओ मला खूप जवळचा वाटला.