एरव्ही ज्या कुत्र्याला आपण हाड्हूड् करतो त्याच कुत्र्याला प्रशिक्षण दिलं, तर तो आपल्या अनेक मानसिक आजारांवर उत्तम उपाय ठरू शकतो. हेच लक्षात घेऊन अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन या संस्थेने कुत्र्यांना प्रशिक्षण देऊन विविध उपक्रम सुरू केले. दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेची गरज आणि उपयुक्तता हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागली असून संस्थेकडे येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे..

३ वर्षांपूर्वीची गोष्ट! ठाण्यातील मीनल लोणकर नावाची तरुणी मानसशास्त्र आणि त्यातही अ‍ॅनिमल सायकॉलॉजी या विषयात एम.ए.चा अभ्यास करत होती. त्या वेळी ठाणे महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष मुलांच्या शाळेसाठी एका कुत्र्याला प्रशिक्षण द्यायचे होते. अ‍ॅनिमल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. करणाऱ्या या तरुणीकडे त्याबद्दल विचारणा केल्यावर तिने लगेचच रूकार दिला. पण या कुत्र्याला अशा प्रकारे प्रशिक्षण देणे शक्य आहे का, याबाबत संशोधन सुरू केल्यानंतर मीनलला आढळलं की, मुंबईतच नाही, तर अख्ख्या भारतात अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी हा प्रकारच अस्तित्वात नाही. मग युनिव्हर्सटिी ऑफ नॉर्थ टेक्सास अँड डेल्टा सोसायटीमधून त्या विषयावर रीतसर प्रशिक्षण घेत तिने एका कुत्र्याला प्रशिक्षण देऊन तीन वर्षांचा उपक्रम जिद्द या शाळेत राबवला. ही सुरुवात होती अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन या संस्थेच्या कामाची!

Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

पुढे २००६मध्ये मीनल लोणकर-कविश्वर यांनी पुण्यात अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन या संस्थेची नोंदणी करून या कामाला एक चौकट दिली. ठाण्यातील जिद्द शाळेचा अनुभव गाठीला घेऊन त्यांनी हळूहळू आपलं काम विस्तारायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाची मदत झालीच. तोपर्यंत इतर प्राणिप्रेमी आणि समविचारी तरुण-तरुणी मीनल यांच्या कामात सहभागी होण्यासाठी सरसावत होते. सुरुवातीला ठाण्याच्या श्री मा बालनिकेतन या शाळेत त्यांनी अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी सुरू केली. त्यानंतर २००६मध्येच पुण्याच्या प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये ऑटिस्टिक मुलांसाठीही काम सुरू झालं. हळूहळू एचआयव्ही-एड्स असलेल्या अनाथ मुलांसाठी काम करणारी मानव्य संस्था, कॅन्सर पेशण्ट्स एड असोसिएशनसारखी संस्था या ठिकाणीही अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनचं काम सुरू झालं. विशेष म्हणजे आज या संस्थेत केवळ प्रशिक्षित कुत्रेच नाही, तर मांजरी, पक्षी आणि मासे यांचाही समावेश आहे.

अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी म्हणजे काय?

अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी म्हणजे माणसांना होणाऱ्या मानसिक आजारांवर किंवा शारीरिक आजारांमुळे येणाऱ्या मानसिक ताणावर प्राण्यांच्या साहाय्याने उपचार करणे! त्याशिवाय गतिमंद किंवा मतिमंद मुलांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठीही या थेरपीचा वापर केला जातो. साधारणपणे कुत्रा हा माणसाचा मित्र मानला जातो. कुत्र्यामध्ये मानवी भावभावना समजून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे हे प्रशिक्षित कुत्रे ज्या वेळी अशा मानसिकरीत्या खचलेल्या किंवा आजारी लोकांच्या संपर्कात येतात, त्या वेळी त्यांची मनस्थिती कुत्र्यांना समजलेली असते.

काही वेळा काही मुले वाचताना अडखळतात, लिहिताना त्यांच्या चुका होतात. अशा वेळी अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपीद्वारे त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवला जातो. अडखळत बोलणाऱ्या मुलांना त्यांच्या वर्गातल्या मित्रांकडून चेष्टेला सामोरं जावं लागतं. अनेकदा वर्गात ती मुलं वाचायला लागल्यावर त्यांची हुर्यो उडवली जाते. पण तेच प्रशिक्षित कुत्र्याला त्यांच्यासमोर बसवून त्या कुत्र्यासमोर वाचायला लावलं, तर तो कुत्रा त्यांचं ते अडखळत चाललेलं वाचन शांतपणे ऐकून घेतो. आपल्याला कोणी हसत नाही, ही भावनाच त्या मुलांना अधिक वाचण्यासाठी प्रोत्साहन देणारी असते. गोल्डन रिट्रिव्हर जमातीसारख्या प्रेमळ मानल्या जाणाऱ्या आणि खूप दाट फर असलेल्या जमातीच्या कुत्र्यांच्या पाठीवर अक्षरांचे धडे गिरवत गिरवत मुलांच्या लिखाणातल्या चुकाही दूर होतात.

हीच गोष्ट शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या मुलांच्या वा व्यक्तींच्या बाबतीतही होते. मुळात शारीरिक किंवा मानसिकदृष्टय़ा अपंग माणसं आणि कुत्रे यांचं नातं नैसर्गिकरीत्याच खूप जवळचं आणि भावनिक असतं. त्यात हे कुत्रे प्रशिक्षित असल्याने ते अनोळखी लोकांच्या अंगावर भुंकत नाहीत, त्यांच्या अंगावर उडय़ा मारत नाहीत. पायाने अधू असलेल्यांना फिजिओथेअरपीदरम्यान खोलीला फेरी मारा किंवा दर दिवशी थोडे चाला, असं सांगितलं जातं. तो रोजचा व्यायाम करणं त्यांच्यासाठी कंटाळवाणं असतं. पण तेच एखादा प्रशिक्षित कुत्रा त्यांच्याबरोबर असेल, तर तोच व्यायाम हसत हसत कधी केला जातो, हेच कळत नाही. त्याशिवाय दर वेळी आपल्याला कोणीतरी चालवत असतं. पण इथे आपण कुत्र्याला फिरवत आहोत, या भावनेनंही त्यांना प्रचंड मनोबल मिळतं.

ऑटिस्टिक मुलांसाठीही ही थेरपी खूपच परिणामकारक ठरते. अशी मुलं जन्मजात अतिचंचल असतात. कधीकधी ती आक्रमकही होतात. ती कधीच समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत. पण या प्रशिक्षित कुत्र्यांसह वावरताना मात्र त्यांची नजर या कुत्र्यांवर खिळलेली असते. ते त्या कुत्र्यांच्या हालचाली नीट बघत असतात. त्यांच्या हाताच्या हालचाली आणि डोळे यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. त्याशिवाय अत्यंत चंचल मुलांचा चंचलपणा व आक्रमकपणा कमी करण्यासाठी त्यांना या प्रशिक्षित कुत्र्यांच्या पोटावर डोकं ठेवून झोपवलं जातं. हळूहळू त्या कुत्र्याच्या श्वासोच्छ्वासाच्या तालावर ही मुलं शांत होतात. त्यांच्या हालचालीतील चंचलपणा कमी होतो.

कॉर्पोरेट क्षेत्रातही अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह देशभरात फोफावलेल्या कॉर्पोरेट संस्कृतीने सुबत्ता आणली, यात वाद नाही. पण सुबत्तेच्या ‘घी’मागून येत असलेला मानसिक ताणतणावांचा ‘बडगा’ आत्ता समोर येऊ लागला आहे. नेमक्या याच काळात अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनने कॉर्पोरेट क्षेत्रातील तणावामुळे खचलेल्यांसाठी आपली अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून सध्या मुंबई विमानतळावर अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन एक उपक्रम राबवत आहे. विमानतळाच्या एका भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस या संस्थेचे प्रशिक्षित कुत्रे उपलब्ध असतात.

सनशाइन फाम्र्स

पुण्यातील पेट सीटर्स या संस्थेच्या सहकार्याने अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनने पुण्यातच सनशाइन फाम्र्स नावाची जागा विकसित केली आहे. हिंजवडीतील चार एकर जागेत प्राणिप्रेमी आणि प्राणी यांच्यासाठी हे नंदनवन फुलवण्यात आलं आहे. अनेकदा पाळीव प्राण्यांना सहलीला घेऊन जाता येत नाही. अशांसाठी ही जागा म्हणजे अगदी आनंदनिधान आहे. संस्थेने या फार्मच्या काही भागात औषधी वनस्पती लावल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या तळी तयार केली असून त्यात गप्पी मासे, कमळ आदी गोष्टी सोडल्या आहेत. आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन तिथे फिरण्यासाठी काही मार्ग तयार केले आहेत. पाळीव कुत्र्यांना शहरात नैसर्गिक वातावरणाची सवयच होत नाही. त्यांना गाडय़ांचा आवाज आणि टायरचा वास याखेरीज दुसरं काहीच मिळत नाही. कुत्र्यांची घ्राणोंद्रियं खूपच संवेदनशील असतात. मात्र त्यांची वास घेण्याची शक्ती शहरात खूपच मर्यादित होऊन जाते. अशा वेळी या कुत्र्यांना या फार्मवर निसर्गातील विविध गंध घेता येतात. कुत्र्यांसह मालकांना काही खेळही खेळता येतात. विशेष म्हणजे ज्यांना कुत्रा पाळणे शक्य नाही, पण आवड आहे, अशांसाठीही इथे संस्थेने सोय केली आहे. या फार्मवर संस्थेचे सहा ते सात प्रशिक्षित कुत्रे नेहमीच असतात. या फार्मवर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटी, काही ट्रेनिंग सेशन्स घेता येतात. त्यातही हे प्रशिक्षित कुत्रे मोलाची भूमिका बजावतात. ट्रेजर हंटसारख्या खेळात माणूस किंवा एखादी टीम आणि त्यांच्याबरोबर एक कुत्रा दिला जातो. कुत्र्याने त्याची इंद्रिये आणि त्या टीममधील लोकांनी त्यांची इंद्रिये वापरून एकत्र तो खेळ खेळायचा असतो. त्यातून टीमवर्कसारखी अनेक मूल्यं नकळत हे प्रशिक्षित कुत्रेच शिकवून जातात.

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

संस्थेचे ठाणे येथील कार्यालय ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे. ठाणे पश्चिमेला उतरल्यावर गोखले मार्गावर गावदेवी मंदिर आहे. या मंदिराबाजूलाच हनुमान मंदिर आहे. त्यासमोर ईशान रेसिडन्सी इमारतीत संस्थेचे कार्यालय आहे.

धनादेश या नावाने पाठवा..

अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन (Animal Angels Foundation) (कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत.)

 

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३८५१३२
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

 

अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्याची गरज

मीनल लोणकर-कविश्वर व त्यांचे सहकारी अधिकाधिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी त्यांना आर्थिक मदतही केली आहे. प्रशिक्षित कुत्र्यांचे पालकत्वही काही कुटुंबांनी स्वीकारले आहे. संस्थेने काही महिन्यांपूर्वी बेंगळुरू आणि दिल्ली या शहरांमध्ये सुरू केलेल्या कामाला आकार देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ही थेरपी, हे काम अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचणेही आवश्यक आहे.

 

अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन

सध्या ही संस्था मुंबई, पुणे आणि ठाणे या परिसरातील संस्थांमध्ये काम करत आहे. आता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा घालवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातही काही आनंदाचे क्षण आणण्यासाठी डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशन काम सुरू करणार आहे.

  • अ‍ॅनिमल एन्जल्स फाउंडेशनने पुण्यातील टाटा मोटर्स या कंपनीसाठी एक थेरपी डॉग प्रशिक्षित करून दिला आहे. हा कुत्रा कंपनीतच वावरत असतो.
  • कर्मचारी कधी त्याच्याशी जाऊन गप्पा मारतात, तर कधी खेळतात. कामाच्या वेळेत येणाऱ्या ताणावर हा उत्तम उपाय आहे. त्याशिवाय या संस्थेने कॉर्पोरेट क्षेत्रासाठी काही खास कार्यक्रमही आखले आहेत.

 

Story img Loader