बिटकॉइन तत्त्वत: यशस्वी झाली, की अशी इतर व्हच्र्युअल चलनेही अस्तित्वात येतील. लोक त्यात मोठय़ा प्रमाणात पसे गुंतवू लागतील. देशोदेशीच्या केंद्रीय बँकांची चलनपुरवठय़ाची मक्तेदारी काही प्रमाणात संपुष्टात येईल, त्यांची खजिना सांभाळण्याची जबाबदारी अधिक पारदर्शक आणि जबाबदार होईल, थोडक्यात त्यांना व्हच्र्युअल चलनाच्या स्पध्रेला सामोरे जावे लागेल..
२००५ साली गॅब्रियल शालोम तरुणाने ‘द फ्यूचर ऑफ मनी’ हा लघुपट बनवला. त्या काळी ‘फ्लटर’ आणि ‘गिफ्टफ्लो’ ही इंटरनेटवर देवाणघेवाण करणारी संकेतस्थळे अस्तित्वात होती. त्यांच्या संस्थापकांच्या मुलाखती तसेच इतर अनेक ग्राहक आणि विक्रेत्यांच्या मुलाखती ‘स्काइप’वर घेण्यात आल्या होत्या. शालोम यांचे असे म्हणणे होते की, विश्वास, पारदर्शकता आणि खुला (ओपन) डेटा यांवर बेतलेली एक संपूर्ण समांतर अर्थव्यवस्था आज अस्तित्वात आहे. शालोम यांच्या मते, तुम्हाला काय हवे, हे तुम्ही काय आहात, यावर ठरत असते आणि म्हणूनच संपूर्णपणे खुल्या (ओपन) डेटाच्या कॉलनीज् आम्ही वसवू पाहतो आहोत. यात सामील होणारे सगळे नेटिझन्स हे पूर्णपणे पारदर्शकतेचा स्वीकार करणारे, असे असतील आणि त्यांना या प्रयोगातून एका नव्या स्तरावरचा आनंद, सुख (Comfort) आणि मन:शांती लाभेल. १) आपण कोण आहोत? २) आपणास काय हवे? ३) आपण काय करू शकतो? आणि ४) आपण कोणाला ओळखतो? याच्या बळावर तुम्ही आपले डिजिटल प्रोफाइल बनवू शकता आणि हे प्रोफाइल मूलत: आणि मूल्यत: अतिशय श्रीमंत – साधनसंपन्न असू शकते. पण यासाठी तुम्ही स्वत:च्या या चारही ताकदींविषयी पूर्णपणे खुले (ओपन) धोरण अवलंबून, स्वत:शी पूर्ण प्रामाणिक असले पाहिजे. शालोम पुढे म्हणतो, तुमची स्वत:ची ओळख आणि प्रोफाइल वापरून फेसबुकसारखी कंपनी जर अब्जावधी डॉलर मिळवू शकते (म्हणजे या डेटाचे वर्गीकरण करून, डेटा सिंक (Sync) करणे, त्याचे व्यापारीकरण (मोनोटायझेशन) करणे हा भाग त्यात आलाच.) जर अशा एखाद्या नेटवर्कच्या आधारे नेटिझन्सनी स्वत:च हा सगळा उद्योग जर आपापल्या स्तरावर केला तर त्यांना त्यांच्याच स्वत:च्या ओळखीचा (Identity) व्यक्तिमत्त्वाच्या (Personality) आणि कॉन्टॅक्टच्या आधारे असे पसे स्वत:साठी डायरेक्ट मिळवता येतील. याचे कारण म्हणजे लोकांचे मित्र, त्यांचा स्वत:चा वेळ आणि स्वत:च्या भावना (Passion) या गोष्टी कोणत्याही चलनातील पशाच्या प्रत्यक्ष मूल्यापेक्षा अधिक मौल्यवान ठरू शकतात. कारण चलनाचे मोजमाप प्रत्यक्ष व्हॅल्यूमध्ये (भोगवटा) होताना प्रत्येक व्यक्तीची, परताव्याच्या मूल्य मोजमापाची फूटपट्टी (Expectations) ही निश्चितच भिन्न असते. ही फूटपट्टी जेव्हा पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष होईल, तेव्हा सरकारी नियंत्रित अधिकृत चलनाचे जोखड त्या व्यक्तीच्या गळ्यातून आपोआप गळून पडेल आणि व्यक्तिसापेक्ष अशी एक नवीन व्हच्र्युअल (आभासी) चलनव्यवस्था निर्माण होईल. त्या व्यक्तीला जागतिक आíथक स्वातंत्र्य मिळेल. गॅब्रियल शालोम यांचे ‘द फ्यूचर ऑफ मनी’ या फिल्ममधील भविष्य, सध्या चच्रेत असलेल्या बिटकॉइन या व्हच्र्युअल चलनाने जवळ-जवळ खरे करून दाखविले आहे.
‘अॅन आऊटलाइन ऑफ मनी’ (An Outline of Money-1940)) या पशावरील मूलग्रंथात अर्थतज्ज्ञ जॉफ्रे क्राउदर (Geoffrey Crowther – ‘द इकॉनॉमिस्ट’ चे माजी संपादक) यांच्या मते ‘Money ultimately derives its value, as we have seen, from the fact that people are prepared to accept it in payment for goods and services.’ (आपण हे जाणतो की, शेवटी पशाचे मूल्य हे उत्पादन आणि सेवा यांच्या विनिमयासाठी, तो स्वीकारण्याची सामान्य माणसाची तयारी कितपत आहे यावर अवलंबून असते.) याचा अर्थ क्लासिकल अर्थशास्त्राच्या पशाच्या व्याख्येत बिटकॉइन फिट बसते. आता बिटकॉइनकडे वळू.
बिटकॉइन हे एकाने दुसऱ्याला देण्याच्या-घेण्याच्या, चलनाच्या दळणवळणाचे नियंत्रण करणारे व्हच्र्युअल अशा डिजिटल चलनाचे आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज नेटवर्क आहे.
LINUX किंवा WIKIPEDIA या ओपनसोर्स प्लॅटफॉर्मप्रमाणे बिटकॉइनचे ओपन इन्फ्रास्ट्रक्चर असून, हे त्याचा वापर करणाऱ्यांच्या संगणकांच्या एकूण शक्तीवर उभारलेले आहे आणि आजमितीला या बिटकॉइन्सच्या डेटाचे मायिनग (खनीकर्म) करणाऱ्या मायनर्सच्या सर्व कॉम्प्युटरची एकूण क्षमता, ही जगातल्या पहिल्या पाचशे अतिविक्राळ गणकयंत्रांच्या क्षमतेपेक्षा १००० पटीने अधिक आहे. प्रकाशाच्या वेगाने वाढणाऱ्या गतीला बिटकॉइन पुरून उरेल, का काळाच्या ओघात नष्ट होईल, हे सांगणे आज तरी अवघड आहे. मुळात बिटकॉइनच्या देवाणघेवाणीचे लेखापालन करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची सर्व भिस्त ही या मायनर्सनी उभारलेल्या प्रचंड कॉम्प्युटिंग पॉवरवर अवलंबून आहे. अर्थात या मायनर्सनी बिटकॉइनचे सॉफ्टवेअर विकत घेऊन त्यात वेळोवेळी योग्य ते बदल करण्याच्या देकारानंतरच, त्यांना मायनर्स म्हणून पुढे जाता येते आणि त्यांना दीड ते दोन टक्के एवढी ट्रॅन्झ्ॉक्शन (देवाणघेवाण) फीसुद्धा मिळते. (क्रेडिट कार्ड स्वीकारणाऱ्या आस्थापनाप्रमाणे) मायनर्सना त्यांचे प्रत्येक ट्रॅन्झ्ॉक्शन (वायदा) संपल्यावर, २५ बिटकॉइन्स (आजच्या विनिमय दराच्या तुलनेत १५,००० डॉलर) एवढे मानधन मिळते. प्रत्येक दहा मिनिटांगणिक एक मायनर हा अशा प्रकारच्या बिदागीचा धनी ठरतो. २०१३ मध्ये बिटकॉइनच्या लोकप्रियतेने कहर केला. १५ डॉलरवरून १००० डॉलपर्यंतच्या मूल्य परताव्याचे निष्कर्ष आता हाती आले आहेत. ‘मायनर’ची गणकयंत्र आणि सॉफ्टवेअर खरेदी गुंतवणूक चार-पाच दिवसांत सहज वसूल होते, असा दावा केला जातो.
बिटकॉइनचा कारभार अधिकृतपणे सिंगापूरमधून चालतो. त्याचा तथाकथित जन्मदाता सातोशी नाकामोटो हा २०१० पासून अज्ञातवासात आहे. एके काळी जागतिक संगीताचे मुक्तद्वार फुकट उघडणाऱ्या नॅपस्टरचे आणि बिटकॉइनचे आíकटेक्चरल साधम्र्य वैज्ञानिकांना चिंतित करीत आहे. नॅपस्टर जसे काळाच्या ओघात नाहीसे झाले तसे बिटकॉइन गायब होण्याची भीती काही तज्ज्ञ व्यक्त करतात. परंतु बिटकॉइनमध्ये त्याच्या डिझाइनअंतर्गतच अशी यंत्रणा आहे की, पशाचा (बिटकॉइन्सचा) पुरवठा हा एका विवक्षित प्रमाणातच निश्चित होतो आणि एका टप्प्यानंतर तो पूर्णपणे थांबतो. यामुळे भांडवलाच्या ओझ्याखाली बिटकॉइनचा बुडबुडा ( (Bubble) होऊन फुटण्याची शक्यता (नॅपस्टरप्रमाणे) नक्कीच कमी राहील.
या नव्या चलनाचा वापर करून भांडवली देशांचे आíथक स्वैराचार रोखता आले, तर केनेशियन अर्थशास्त्राची ‘जनरल थिअरी’ पुन्हा एकदा डोळ्यावरचा चष्मा आणि झापडे काढून नव्याने लिहावी लागेल. स्वत:लाच पुन्हा एकदा आरशात न्याहाळून पाहावे लागेल, इतके जग बदलेल. आसुरी संपत्तीतून निर्माण होणाऱ्या माजाचे परिणाम वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात,
कुबेर आथिला होये। परी तो नेणे माझी सोये। संपत्ति मजसम नव्हे। श्रीनाथाही। (ज्ञानेश्वरी- सोळावा अध्याय, ओवी-३५७)
म्हणजे मीच कुबेराहून संपन्न। लक्ष्मीपतीहूनही ऐश्वर्य। मीच शुद्ध मीच सिद्ध। ब्रह्मदेवही पडला हलका॥ (इति रविन थत्ते)
पशाच्या प्रचंड आणि अनियमित उपलब्धतेमुळे फेड (अमेरिकेची सेंट्रल बँक) आणि तिच्याशी संलग्न असलेल्या जागतिक अर्थव्यवस्था, माऊलीने वर्णिलेल्या अघोरी संपत्तीने माजावर असल्यासारख्या वागताना दिसतात. भ्रष्टाचाराने रसातळास गेलेल्या कुणाला ‘बेलआऊट’ दे, व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर बसविल्याने गाळात गेलेल्या कोणाला ‘स्टिम्सुलस’चे अमृत पाज, युद्धसामग्री, ड्रग्ज, शस्त्रे याचा व्यापार करणाऱ्यांना टेबलाखालून पसे पुरविणाऱ्या बँकांची ‘राइट ऑफ’ सोडवणूक कर असे प्रकार आता जगात वाढत्या प्रमाणात सातत्याने घडताना दिसतात. हे सर्व चोचले शेवटी जनतेच्या पशावरच पुरवले जातात. यात तोटा हा सर्वसामान्य जनतेचा होत असतो. या राजकीय वेडाचाराला बिटकॉइनसारख्या आभासी पण समांतर चलनांमुळे काही प्रमाणात चाप बसेल. बिटकॉइन तत्त्वत: यशस्वी झाली, की अशी इतर व्हच्र्युअल चलनेही अस्तित्वात येतील, लोक त्यात मोठय़ा प्रमाणात पसे गुंतवू लागतील. देशोदेशीच्या केंद्रीय बँकांची चलनपुरवठय़ाची मक्तेदारी काही प्रमाणात संपुष्टात येईल, त्यांची खजिना (ट्रेझरी) सांभाळण्याची जबाबदारी अधिक पारदर्शक आणि जबाबदार होईल, थोडक्यात त्यांना व्हच्र्युअल चलनाच्या स्पध्रेला सामोरे जावे लागेल. आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे ‘विश्वधर्मीय’ आभासी-व्हच्र्युअल उद्दिष्ट वास्तवात आणण्यासाठी उचलेले हे एक छोटे पाऊल असेल, अशी आशा वाटते. अशा प्रयोगाला गुगल आणि पे-पालसारख्या कंपन्या निव्वळ नफेखोरीसाठी पाठिंबा देत नसून, त्यामागील संकल्पनेला पािठबा आणि भरघोस अर्थसहाय्य गुंतवणुकीच्या स्वरूपात देत आहेत. ही संकल्पना देशोदेशीच्या केंद्रीय बँकांतून चाललेल्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊन, अर्थकारणाचे राजकारण करून सामान्यांचे आíथक नुकसान करणाऱ्या राजसत्तांना चाप लावण्याची असेल. गुगल आपल्या जागतिक विधायक कामाबद्दल सातत्याने बोलत आहे, आणि काही प्रमाणात तसे भरीव काम करूनही दाखवीत आहे. पारंपरिक अर्थशास्त्राचा उद्गाता अॅडम स्मिथने ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ चा विचार केला, तर गुगल आधुनिक अर्थशास्त्रात ‘हेल्थ ऑफ नेशन्स’चा विचार करते आहे असे दिसते आहे आणि भविष्यातील गुगलची वाटचाल ही ‘हेल्थ ऑफ ह्य़ूूमन्स’ या विषयाकडे होताना आता स्पष्टपणे समोर येत आहे. या सर्व संदर्भात बिटकॉइनच्या प्रगतीकडे पाहाता, शेवटी कोणत्याही मोठय़ा क्रांतीची -लॉँग मार्चची सुरुवात ही एका छोटय़ा पावलानेच होत असते, हे खरे!
संदर्भ:
The Future of Money (http://www.fastcompany.com/1700002/data-nudist-gabriel-shalom-on-open-video-trust-and-the-future-of-money)
http://www.economist.com/node/21590901/email
http://www.economist.com/node/21590766/print
http://en.wikipedia.org/wiki/Bitcoin
http://www.bitcoin.com
बिटकॉइनचे चलनी-आव्हान
बिटकॉइन तत्त्वत: यशस्वी झाली, की अशी इतर व्हच्र्युअल चलनेही अस्तित्वात येतील. लोक त्यात मोठय़ा प्रमाणात पसे गुंतवू लागतील. देशोदेशीच्या केंद्रीय
First published on: 05-01-2014 at 01:28 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Currency challenge of bitcoin