चिंचवड येथे बंद सदनिकेचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरटय़ाने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग कृष्णजी लवेळकर (रा. देवकर पॅराडाईज, गांधी पेठ, चिंचवड) यांनी  याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवेळकर हे मंगळवारी सदनिका बंद करून बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी सकाळी परत आल्यावर त्यांना आपल्या सदनिकेचा दरवाजा तोडलेला दिसला. कपाटात ठेवलेले ६८ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख ५० हजार असा एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader