जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून िपपरी रेल्वे उड्डाणपुलाखाली सुरू असलेला कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतची माहिती संबंधित व्यावसायिक व पोलीस यंत्रणेलाही कळवण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून िपपरीतील कत्तलखाना बंद करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी जोर धरू लागली होती. मातृभूमी दक्षता चळवळ या संघटनेने महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. २९ नोव्हेंबरला गोवंश रक्षा समितीच्या पुढाकाराने या मागणीसाठी सर्वपक्षीय महामोर्चा काढला. खासदार गजानन बाबर, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, अमर साबळे, माजी महापौर संजोग वाघेरे, बांधकाम व्यावसायिक संदीप वाघेरे, मिलिंद एकबोटे, डॉ. कल्याण गंगवाल व मोठय़ा संख्येने नागरिक त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली असता याबाबतची सर्व माहिती घेऊ व आठ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले होते. त्यानंतर, भरवस्तीत असलेल्या कत्तलखान्यास असलेला विरोध लक्षात घेऊन आयुक्तांनी हा कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.     

Story img Loader