अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर फटाक्यांच्या माळा लावल्या. पेढे वाटले, तर महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. या वातावरणात अजितदादांनी दुपारी शहरात भेट देऊन खासदार गजानन बाबर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
अजितदादांचा शुक्रवारी सकाळी शपथविधी झाला. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महापालिकेतही सत्ताधारी गोटात आनंदाचे वातवरण होते. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर अजित पवार मुंबईतून पुण्याकडे रवाना झाले. दुपारी दीडच्या सुमारास रावेत येथे बाबर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील टिळक रस्त्यावरील कार्यालयातही कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोश केला. शांतीलाल मिसाळ, शैलेश बडदे, शिल्पा भोसले, अनिल आगवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.    

Story img Loader