पुणे-मुंबई मार्गावर फुगेवाडी-दापोडी-खडकी दरम्यान सोमवारी सायंकाळी काही ठिकाणचे सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
वाहतूक पोलिसांनी ही कोंडी दूर करण्यासाठी खूप वेळ लागला. रात्री साडेआठ पर्यंत या मार्गावरील वाहतूक संथ गतीने वाहत होती. दापोडी येथील काही सिग्नल बंद असल्यामुळे पुढे जाण्याच्या
नादात वाहतुकीची कोंडी
झाली. त्यामुळे फुगेवाडी व खडकीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षाला वाहतूक कोंडीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.     

Story img Loader