केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या संस्थेच्या ‘बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाविषयी..
देशाच्या विकासदर वृद्धीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हॉटेल, हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन या क्षेत्रांचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या क्षेत्रांतील तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण-प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. ही जबाबदारी नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या राष्ट्रीय संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित- प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे, विविध कालावधीचे रोजगारक्षम व उत्तम करिअर घडण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यांत बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटिरग मॅनेजमेंट या महत्त्वाच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दर वर्षी सामायिक प्रवेश चाचणी घेतली जाते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ५१ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यांमधील २१ संस्थांना केंद्रीय अर्थसाहाय्य मिळते तर १९ संस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
करिअर संधी
या कौन्सिलद्वारे प्रमाणित केलेला अभ्यासक्रम दर्जेदार असतो. हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात पाऊल रोवण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. आतापावेतो या संस्थेने सुमारे ८० हजार उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे. यांतील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्याशिवाय अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. या संधींमध्ये रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल आणि संबंधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठय़ा हॉटेल समुहांमध्ये किचन व्यवस्थापक, हाऊसकीिपग व्यवस्थापक, राज्य पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, विमान सेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, भारतीय नौसेना- आतिथ्य सेवा, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रांसाठी आवश्यक ग्राहक सेवा अधिकारी, प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी, रुग्णालये आणि मोठय़ा कॉर्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा आदींचा ठळकरीत्या उल्लेख करावा लागेल.
हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात अशा तऱ्हेने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ व पेय सेवा, हाऊसकीिपग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध करून दिले जाते. हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), अन्नसुरक्षा, गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्यूहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य या बाबीही शिकवल्या जातात.
अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण उमेदवाराला प्रवेश मिळू शकतो. मात्र, या उमेदवाराने इंग्रजी विषयाचा अभ्यास बारावीला करणे आवश्यक आहे. खुल्या आणि इतर मागासवर्ग उमेदवारांसाठी उमेदवाराचे कमाल वय १ जुल रोजी २२ वष्रे असावे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी हे वय २५ वष्रे असावे. राखीव जागा- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, २७ टक्के जागा नॉन क्रिमिलेअर ओबीसींसाठी आणि ३ टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतात.
परीक्षा पद्धती : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची चाळणी परीक्षा दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाते. ती २०० गुणांची असते. प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात- इंग्रजी भाषा (६० गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (६० गुण), कार्यकारणभाव आणि ताíकक क्षमता (६० गुण) असे २०० प्रश्न विचारले जातात. कालावधी- तीन तास.
इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल, कार्यकारणभाव आणि ताíकक क्षमता या विषयात अचूक उत्तरांसाठी १ गुण दिला जातो. उत्तर चुकल्यास ०.२५ टक्के गुण कापले जातात. सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल या विषयाचे गुण देताना संपूर्णरीत्या अचूक उत्तरासाठी एक गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.७५ गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.५० गुण अशा श्रेणीने गुण दिले जातात. उत्तर चूक असल्यास ०.२५ गुण वजा केले जातात. ही परीक्षा देशातील ३३ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये राज्यातील पुणे, नागपूर आणि मुंबई शहरांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात घोषित केला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १८ जुलपासून होतो.
शुल्क अर्थसाहाय्य- केंद्रीय संस्थांमधील योजनेंतर्गत प्रत्येक सत्रातील शुल्काच्या ५० टक्के रकमेचा परतावा मिळतो. प्रत्येक वर्षांतील दोन्ही सत्रांच्या समाप्तीनंतर होणाऱ्या अखिल भारतीय वार्षकि परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांच्या उमेदवारांना हॉटेल उद्योजकांच्या सहकार्याने गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या राज्यातील शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती मिळू शकते.
संपर्क- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी, ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा- २०१३०९. संकेतस्थळ- http://www.nchm.nic.in

एपीजे अब्दुल कलाम पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप
युनिव्हर्सटिी ऑफ साऊथ फ्लोरिडामध्ये पुढे नमूद केलेल्या विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये अ‍ॅप्लाइड अँथ्रॉपॉलॉजी, अ‍ॅप्लाइड फिजिक्स, सेल बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इंजिनीअिरग, क्रिमिनॉलॉजी, इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, मरिन सायन्स अ‍ॅण्ड सायकॉलॉजी या विषयांचा समावेश आहे.
अर्हता : भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास शिकवणी शुल्क माफ केले जाते. तसेच प्रत्येक वर्षी दरमहा दोन हजार डॉलर्स असे पुढील चार वर्षांसाठी विद्यावेतन दिले जाते.
संपर्क : http://www.usf.edu/ world/ resources/ kalamfellowship.aspx

कारुण्य एन्ट्रन्स टेस्ट (केईई- २०१६)
कारुण्य युनिव्हर्सटिीअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरीय कारुण्य एन्ट्रन्स टेस्ट (केईई- २०१६) घेण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई केंद्राचा समावेश आहे.
संपर्क- कारुण्य नगर, कोईम्बतूर- ६४१११४.
संकेतस्थळ- admissions.karunya.edu
ई-मेल- admissions@karunya.edu

Story img Loader