इंडियन मेरिटाइम विद्यापीठाच्या अंतर्गत स्कूल ऑफ नॉटिकल सायन्स, स्कूल ऑफ मरिन इंजिनीअिरग, स्कूल ऑफ नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग अशा तीन  संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमधील अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..

स्कूल ऑफ नॉटिकल सायन्सचे अभ्यासक्रम

एक वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन लीिडग टू बी.एस्सी इन अ‍ॅप्लाइड नॉटिकल सायन्स हा अभ्यासक्रम मुंबई, चेन्नई आणि कोची कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे.

अर्हता-  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये  बारावी परीक्षेत ६० टक्के गुण किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांसह बी.एस्सी. किंवा बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स. मात्र या अभ्यासक्रमाच्या कालावधीत कोणत्याही एका वर्षी भौतिकशास्त्राचा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यास केलेला असावा. किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक अथवा कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह बी.ई. किंवा बी.टेक. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत. पुरुष उमेदवारांचे शुल्क- २ लाख २० हजार रुपये. महिला उमेदवारांचे शुल्क- १ लाख ४० हजार रुपये.

तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन नॉटिकल सायन्स हा अभ्यासक्रम चेन्नई आणि मुंबई या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे.

अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये बारावी परीक्षेत ६० टक्के गुण. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये

५ टक्के सवलत. इंग्रजीसाठी ही अट लागू नाही. पुरुष उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- २ लाख २० हजार रुपये, महिला उमेदवारांसाठी शुल्क- १ लाख ४० हजार रुपये.

तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन मेरिटाइम सायन्स हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये बारावी परीक्षेत ६० टक्के आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण आवश्यक. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत. इंग्रजीसाठी ही अट लागू नाही. पुरुष उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- २ लाख २० हजार रुपये. महिला उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- १ लाख ४० हजार रुपये.

 

स्कूल ऑफ मरिन इंजिनीअिरगचे अभ्यासक्रम

चार वष्रे कालावधीचा बी.टेक. इन मरिन इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम कोलकाता आणि मुंबई कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये बारावी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमधून ५ टक्के सवलत उपलब्ध आहे. इंग्रजीसाठी ही अट लागू नाही. पुरुष उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- २ लाख २५ हजार रुपये, महिला उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- १ लाख ४५ हजार रुपये.

 

स्कूल ऑफ नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनीअिरगचे अभ्यासक्रम

तीन वष्रे कालावधीचा बी.एस्सी. इन शिप बििल्डग अ‍ॅण्ड रिपेअर हा अभ्यासक्रम कोची कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे.

अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये बारावी परीक्षेत ६० टक्के गुण. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमधून ५ टक्के सवलत उपलब्ध आहे. इंग्रजीसाठी ही अट लागू नाही. निवासी वार्षकि शुल्क- २ लाख रुपये.

चार वष्रे कालावधीचा बी.टेक. इन नेव्हल आíकटेक्चर आणि  ओशन इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांमध्ये बारावी परीक्षेत ६० टक्के गुण. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण. अनुसूचित जाती किंवा संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत आहे. इंग्रजीसाठी ही अट लागू नाही. पुरुष व महिला उमेदवारांसाठी वार्षकि शुल्क- २ लाख २५ हजार रुपये.

प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. यासाठी १३ मे २०६ पर्यंत नाव नोंदवता येईल. ही परीक्षा ४ जून २०१६ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये घेतली जाईल.

महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे केंद्राचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहीर केला जाईल.

८ जून ते ३० जून २०१६ या कालावधीत ऑनलाइन समुपदेशनाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ४ जुल ते ३१ जुल २०१६ या कालावधीत प्रमाणपत्रे तपसणी आणि समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०१६ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल.

या चाळणी परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि कलचाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सर्वसाधारणत: बारावीच्या (सीबीएसई- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन/ आयसीएसई- इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन/ राज्य शिक्षण मंडळ) अभ्यासक्रमावर विचारले जातात. परीक्षेत निगेटिव्ह गुणपद्धती नाहीत.

चाळणी परीक्षा- खुल्या गटातील संवर्गासाठी चाळणी परीक्षा शुल्क एक हजार रुपये आणि राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ७५० रुपये आहे.

एकूण जागांपकी १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग आणि नॉन क्रीमीलेअर इतर मागास प्रवर्ग या संवर्गासाठी २७ टक्के जागा आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ३ टक्के जागा राखीव आहेत.

अर्हता- या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांचे वय १ ऑगस्ट २०१६ रोजी किमान १६ आणि कमाल २५ वष्रे असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात आली आहे.  फक्त अविवाहित उमेदवारच या अभ्यासक्रमांना अर्ज करू शकतात. अंतिम निवड ही वैद्यकीय चाचणीनंतर केली जाते.

२०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या संस्था विद्यापीठाच्या सामाईक ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सामील होणार नाहीत. केवळ या विद्यापीठातील वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू होईल.  विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी संलग्न संस्थांकडे प्रवेशासाठी थेट संपर्क साधू शकतात.

 

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर

नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू केले आहे.

अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही अभियांत्रिकी विषयातील पदवी. हे दोन्ही अभ्यासक्रम पुणे येथील कॅम्पसमध्ये करता येतात.

संपर्क- हेड, अ‍ॅडमिशन डिपार्टमेंट, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, २५/१, बालेवाडी, एनआयए, पोस्ट ऑफिस पुणे- ४११०४५.

संकेतस्थळ- http://www.nicmar.ac.in

ईमेल- admission@nicmar.ac.in

 

 

– सुरेश वांदिले

 

Story img Loader