रोबो तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख..

गेल्याच पंधरवडय़ात जपानमधली बातमी होती की तिथे एका आलिशान हॉटेलमध्ये आता सर्व कामे ही रोबोसेवक आणि रोबोसेविकाच करतील. श्रीयुत किंवा श्रीमती रोबो यांच्या ताब्यात देण्यात आलेले हे हॉटेल आता सुरूही झाले आहे. रोबो तंत्रज्ञानामुळे हा चमत्कार घडू शकला. कृत्रिम तंत्रज्ञानाने मानवापेक्षाही अधिक काम करण्याची शक्ती रोबोंना प्राप्त होत आहे. या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर विविध क्षेत्रांत सुरू झाला असून त्यात नवनवे संशोधन सुरू आहे.

got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Success Story of Trishneet arora founder of tac security once failed in 12th now reliance and bsc are his clients
शाळा सोडली, बारावीत नापास झाला पण हार मानली नाही! पाहा पठ्ठ्याने कशी सुरू केली अब्जावधीची कंपनी; आता रिलायन्स, BSE सारख्या मोठ्या कंपन्यांना देतोय सेवा
My Portfolio answer to finding right bearing NRB Bearings Limited
माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर

ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी समन्वय आणि संपर्क साधण्याचे कौशल्य रोबोंना प्राप्त करून देण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. हैदराबादस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने गेल्या वर्षी स्नेक रोबोटची निर्मिती केली. विविध प्रकारच्या संकटसमयी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हा स्नेक रोबोट उपयुक्त ठरू शकतो. विशेषत: ढिगाऱ्याखाली सापडलेल्या आपद्ग्रस्तांची अचूक स्थाननिश्चिती करण्याची क्षमता या रोबोंमध्ये आहे. अंतराळातील संशोधन मोहिमांना मिळालेल्या यशात विविध प्रकारच्या रोबोंचा मोठा हातभार आहे. अंतराळातील नव्या विश्वाच्या शोधापासून नव्या विश्वातील वसाहतीच्या निर्मितीमध्ये या रोबोंची कामगिरी अनन्यसाधारण राहणार आहे. आण्विक संशोधन, सागरतळांचा शोध, विविध प्रकारच्या खाणींच्या शोध तसेच ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात येऊ शकते, अशा ठिकाणी सहज वावर करण्यासाठी रोबोंचा उपयोग केला जात आहे.

रोबो तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता भविष्यात रोबोटिक्स अभियांत्रिकी या ज्ञानशाखेसही महत्त्व प्राप्त होणार आहे. रोबोटिक्स अभियंते हे रोबोटिक्स क्षेत्रातील संशोधन, नवे डिझाइन, रोबोंची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती, रोबोसाठी आवश्यक अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता नियंत्रण, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो-प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रात कार्यरत राहू शकतात.

रोबोटिक इंजिनीअिरग ही आंतरज्ञानशाखा आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीचा यांमध्ये या शाखेचा समावेश होतो. रोबोटिक्स अभियंत्यांना विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळू शकते. यांमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, औषधीनिर्मिती, अंतराळ संशोधन, नॅनो तंत्रज्ञान अशा काही क्षेत्रांचा उल्लेख करता येईल. पदवीनंतर करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी या क्षेत्रात स्पेशलायझेशन केल्यास उत्तमोत्तम आणि दर्जेदार करिअर संधी मिळू शकतात. स्पेशलायझेशनमध्ये मशिन ऑटोमेशन, मेडिकल रोबोटिक्स, सायबरमेटिक्स, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट अशा काही क्षेत्रांचा ठळकपणे उल्लेख करता येईल. काही पाश्चिमात्य देशांतील कृषी क्षेत्रातही रोबोतंत्रज्ञानावर आधारित विविध यंत्रसामग्रीच्या वापरात सतत वाढ होत आहे. काही मोठय़ा क्षेत्रांचे संपूर्ण नियंत्रण रोबोंकडेच सोपल्याचेही दिसून येते.

करिअर संधी :

ल्लरोबो डिझाइन इंजिनीअर ल्लफ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चुिरग इंजिनीअर ल्लऑटोमेटेड प्रॉडक्ट डिझाइन इंजिनीअर ल्लएन्व्हायर्नमेन्टल अ‍ॅनॅलिसिस इंजिनीअर ल्लआर्टििफशिअल इंटेलिजन्स- थिकिंग मशीन अ‍ॅण्ड सिस्टीम्स ल्लमेडिकल इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअर ल्लओशन डायिव्हग इंजिनीअर ल्लमिनरल अ‍ॅक्स्ट्रॅक्शन इंजिनीअर ल्लसिस्टीम डिझाइन अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसिस इंजिनीअर ल्लस्पेस सव्‍‌र्हे अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसिस इंजिनीअर  ल्लमेडिकल इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअर.

संस्था आणि अभ्यासक्रम :

  • युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज

या संस्थेने एम.टेक् इन रोबोटिक्स इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- दहावी आणि बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण आणि ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग किंवा इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल इंजिनीअिरग किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग यांपकी कोणत्याही एका विषयातील पदवी. मुंबई येथे २३ मे २०१६ रोजी या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी मुलाखत/ निवड चाचणी घेतली जाणार आहे. संपर्क- एनर्जी एकर्स, पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया प्रेमनगर, देहराडून- २४८००७.

संकेतस्थळ-  www.upes.ac.in

  • एसआरएम युनिव्हर्सटिी

या संस्थेने एम.टेक् इन रोबोटिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- मेकॅनिकल इंजिनीअिरग या विषयातील बी.ई. किंवा बी.टेक्. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एसआरएम ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते. संपर्क- डायरेक्टर अ‍ॅडमिशन, एसआरएम युनिव्हर्सटिी, कट्टनकुलांथूर- ६०३२०३. जिल्हा- कांचिपुरम.

संकेतस्थळ- srmuniv.ac.in

ईमेल- director.admissions@srmuniv.ac.in

  • हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स चेन्नईच्या या संस्थेने पदवी स्तरीय बी.टेक् इन रोबोटिक्स अ‍ॅण्ड कंट्रोल आणि पदव्युत्तर पदवीस्तरीय एम.टेक् इन रोबोटिक्स अ‍ॅण्ड कंट्रोल हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

संकेतस्थळ- hindustanuniv.ac.in

ईमेल- info@hindustanuni.ac.in

  • कान्रेजी मेलॉन युनिव्हर्सटिी

ही जगातील महत्त्वाची आणि दर्जेदार अशी शिक्षणसंस्था आहे. या संस्थेच्या स्कूल ऑफ रोबोटिक्सने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत : * पीएच.डी. इन रोबोटिक्स : रोबोटिक्स या विषयात या संस्थेने जगातील पहिला डॉक्टोरल अभ्यासक्रम सुरू केला आहे. * मास्टर ऑफ सायन्स इन रोबोटिक्स : दोन वष्रे कालावधीच्या या अभ्यासक्रमात रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या मूलभूत बाबी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. * मास्टर ऑफ सायन्स इन रोबोटिक सिस्टीम्स डेव्हलपमेंट : कालावधी-दोन वष्रे. या अभ्यासक्रमाचा भर रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या विषयांवर आहे. * मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर व्हिजन : कालावधी- १६ महिने. * ऑफ सायन्स इन रोबोटिक्स टेक्नॉलॉजी : कालावधी- दोन वष्रे. रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या मूलभूत बाबी, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अशा विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. * बॅचलर ऑफ सायन्स विथ अ‍ॅडिशनल रोबोटिक्स मेजर * बॅचलर ऑफ सायन्स प्लस रोबोटिक्स : पदवीस्तरावरील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

संपर्क-  www.ri.cmu.edu , www.cmu.edu

प्रवेशासाठी थेट अर्ज करता येतो. GRE- ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झॉमिनेशन, TOEFL- टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज अ फॉरेन लॅग्वेज, IELTS – इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेिस्टग सिस्टीम्स या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवल्यास या संस्थेत प्रवेश मिळणे सुलभ होऊ शकते.

बी.एस्सी. इन अलाइड मेडिकल सायन्सेस

जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेमार्फत  बी.एस्सी. इन अलाइड मेडिकल सायन्सेस या विषयांतर्गत येणाऱ्या डायलेसिस टेक्नॉलॉजी, मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, कॉíडअ‍ॅक लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, अ‍ॅनेस्थिशिया टेक्नॉलॉजी या स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० जुल २०१६ रोजी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.

अर्हता- जीवशास्त्र या विषयासह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ६ जून २०१६.

परीक्षा केंद्रे- गांधीनगर, भुवनेश्वर, मुंबई, नवी दिल्ली.

संपर्क- www.jipmer.edu.in

 

Story img Loader