डीजे होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संस्थांनी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याविषयी अधिक माहिती..

Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल

मनोरंजनाच्या क्षेत्रात डीजेंना चांगलाच वाव मिळत असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे नवे क्षेत्र आव्हानात्मक तसेच समाधान देणारेही आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांकडे संगीताच्या जोडीला उत्तम संवादकौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे. डीजे म्हणजे डिस्क जॉकी, आरजे म्हणजे रेडिओ जॉकी आणि व्हीजे म्हणजे व्हिडीओ जॉकी. या तीनही जॉकींचे मुख्य काम प्रेक्षकांचे रंजन करणे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे भाषेवर प्रभुत्व, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, तंत्रकौशल्य आदी गुणवैशिष्टय़े असणे गरजेचे आहे.

रेडियो जॉकींना रेडिओवरील कार्यक्रम सादरीकरणाच्या पलीकडे विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यांना रेडिओवरील कार्यक्रमाचे लिखाण तसेच इतर तांत्रिक बाबींची माहिती असणे गरजेचे असते. प्रसंगावधान, सखोल वाचन, विविध सामाजिक प्रश्नांची जाणीव, दैनंदिन घडामोडींचे विश्लेषण करण्याची क्षमता, आत्मविश्वास, संवादकौशल्य हीसुद्धा काही महत्त्वाची गुणवैशिष्टय़े आवश्यक ठरतात.

आघाडीच्या संस्था :

  • स्कूल ऑफ ब्रॉडकािस्टग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन : या संस्थेने सर्टििफकेट कोर्स इन-व्हॉइसिंग अ‍ॅण्ड रेडिओ जॉकिइंग, टीव्ही अँकिरग हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.  संपर्क- स्कूल ऑफ ब्रॉडकािस्टग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, अंधाक्षी बििल्डग- ३७, गिल्बर्ट हिल रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५८. संकेतस्थळ-  sbc.ac.in    ई-मेल- info@ sbc.ac.in
  • झी इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आर्ट्स : संस्थेचे अभ्यासक्रम- =व्हॉइसिंग अ‍ॅण्ड टीव्ही प्रेझेंटेशन. कालावधी- सहा महिने. अभ्यासक्रमात संवाद कौशल्य, भाषा, उच्चार, टीव्ही कार्यक्रम सादरीकरणाच्या मूलभूत बाबी, व्यक्तिमत्त्व विकास, देहबोली आदींचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर रेडिओ कार्यक्रम सादरकत्रे, टॉक शोचे सादरकत्रे, रिअ‍ॅलिटी शोचे सादरकत्रे, डिबग आर्टस्टि अशा संधी मिळू शकतात.

*इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रोग्रॅिमग- कालावधी- सहा महिने. इलेक्ट्रॉनिक म्युझिक तंत्रज्ञान संगीत नियोजन, रेडिओ, टीव्ही कार्यक्रम, जिंगल्सचे ध्वनीमुद्रण यामध्ये वापरले जाते. या अभ्यासक्रमात ध्वनीची मूलभूत तत्त्वे, ध्वनीक्षेपण तंत्रज्ञान, सिग्नल प्रोसेसर, डिजिटल ऑडिओ टेक्नॉलॉजी, लाइव्ह रेकॉìडग, गाणे निर्मितीची प्रक्रिया आदी विषयांचे ज्ञान दिले जाते.

संपर्क- झी इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया आर्ट्स, आशिकी बंगला, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी- पश्चिम,

मुंबई- ४०००५३. संकेतस्थळ- www.zimainstitute.com

  • व्हिसिलग वूड इंटरनॅशनल : या संस्थेने टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या संस्थेच्या सहकार्याने संबंधित अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

*सर्टििफकेट इन डीजेइंग- या अभ्यासक्रमात विविध संगीत प्रकारांचा अभ्यास, डीजेंची कार्यपद्धती, संगीत कार्यक्रम निर्मिती, गर्दीचे समन्वयन, यंत्रसामग्रीचा अभ्यास व तंत्रांची माहिती या बाबींचा समावेश करण्यात येतो. कालावधी- ३ महिने.

*सर्टििफकेट इन अँकिरग/ न्यूज रीिडग/ व्हीजेइंग- या अभ्यासक्रमात कॅमेऱ्यासमोर सादरीकरण, बातम्यांची मूल्ये, यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. कालावधी- ३ महिने.

*अ‍ॅडव्हान्स्ड सर्टििफकेट इन रेडिओ प्रोग्रॅिमग. कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमात रेडिओच्या कार्यक्रमांची विविध पद्धती व प्रकारांमध्ये निर्मिती तंत्र, ध्वनीमुद्रण, रेडिओ कार्यक्रमाचे संपादन, मुलाखतीचे तंत्र, व्हॉइस मॉडय़ुलेशन आवाजातील चढउतार, ध्वनीचे संपादन या बाबी शिकवल्या जातात.

  • स्पिनगुरू : दिल्लीस्थित स्पिनगुरू या संस्थेने डीजे कोर्स सीडी टर्नटेबल हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात डीजेला हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांचा वापर, विविध प्रकारच्या संगीताची तोंडओळख, ध्वनिमिश्रण आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. कालावधी- ५६ तास.

संपर्क- spingurus.com

  • स्क्रॅच डीजे अ‍ॅकॅडमी : संस्थेचे अभ्यासक्रम-

*प्रारंभिक डीजे कोर्स : कालावधी- ४० तास.

*त्यानंतरचा डीजे कोर्स : कालावधी- ६० तास.

*अ‍ॅडव्हान्स्ड डीजे कोर्स : कालावधी- ८० तास.

*इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रॉडक्शन : कालावधी- ६० तास.

*व्हिडीओ डिस्क जॉकी कोर्स : कालावधी- ४८ तास.

संपर्क- www.skratchdj.in

  • साऊंड ऑफ सोल : संस्थेचे अभ्यासक्रम- =बिगिनर डीजे कोर्स : कालावधी- ४८ तास. =प्रगत डीजे कोर्स : कालावधी- ७२ तास. =डीजे विथ अब्लेटॉन लाइव्ह : कालावधी- २४ तास. संपर्क- soundofsoul.in
  • बोधिसत्त्व म्युझिक प्रॉडक्शन : संस्थेचे अभ्यासक्रम-

डीजेइंग ऑन कन्सोल : कालावधी- दोन महिने. *डीजेइंग ऑन ट्रॅक्टॉर : कालावधी- एक महिना. *डीजेइंग ऑन व्हच्र्युअल : कालावधी- एक महिना. *कॉम्प्युटर डीजेइंग अ‍ॅण्ड म्युझिक प्रॉडक्शन: कालावधी- तीन महिने.

संपर्क – http://www.electronic-music-production-delhi-gurgaon.bodhisatvas.in

  • अभिषेक मंत्री अ‍ॅकॅडमी : संस्थेचे अभ्यासक्रम-

*बेसिक डीजे कोर्स : कालावधी- १५ तास. = इंटरमिजिएट

डीजे कोर्स : कालावधी- २५ तास. = क्लब डीजे कोर्स : कालावधी- ४८ तास.

संपर्क- www.abhishekmantri.com/  academy.html

  • देव म्युझिक अ‍ॅकॅडमी : पुणेस्थित या संस्थेचे अभ्यासक्रम- डिप्लोमा इन डीजे मििक्सग- कालावधी- सहा महिने. संपर्क- devsmusicacademy.com
  • पार्टीमॅप डीजे अ‍ॅकॅडमी : अभ्यासक्रम- अ‍ॅडव्हान्स्ड डीजे कोर्स फॉर बिगिनर्स- कालावधी तीन महिने.

संपर्क-  www.partymap.in

  • ग्लोबल डीज अ‍ॅकॅडमी : मुंबईस्थित या संस्थेचे अभ्यासक्रम- = शॉर्ट टर्म डीजे कोर्स कालावधी- दीड महिना. * इंटेन्सिव्ह डीजे कोसर्. कालावधी – दोन महिने. * इन डेप्थ डीजे कोर्स कालावधी- चार महिने.* डिजिटल डीजे लाइव्ह कोर्स. संपर्क- globaldj.co.in
  • अर्बन पीआर ओ : अभ्यासक्रम- प्रोफेशनल डीजे कोर्स. कालावधी- तीन महिने. संपर्क- urbanpro.com
  • अ‍ॅझरेडो अ‍ॅकास्टिक्स : या संस्थेने डीजे मििक्सग कोर्स सुरू केला आहे. कालावधी- दोन महिने. या संस्थेने डीजे कॉम्पिटिशन कोर्ससुद्धा सुरू केला आहे. कालावधी- दोन महिने.

संपर्क-  www.azaredo.com

  • डीजे इन्स्टिटय़ूट, मुंबई : या संस्थेने बेसिक कोर्स फॉर बिगिनर्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- दोन महिने. हा पहिल्या स्तरावरील अभ्यासक्रम आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील अधिक प्रगत अभ्यासक्रमही करता येतो.

संपर्क- djsurr.com

सर्टििफकेट इन फिटनेस ट्रेिनग

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट्स या संस्थेने ‘सर्टििफकेट इन फिटनेस ट्रेिनग’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो. कालावधी- पूर्णकालीन एक महिना प्रत्यक्ष प्रशिक्षण, अल्पकालीन ३ महिने आणि एक महिना इंटर्नशिप. प्रवेश थेट दिला जातो. संपर्क- मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रुझ-पूर्व, मुंबई- ४०००९८.

संकेतस्थळ- www.giced.mu.ac.in

ईमेल- garware@giced.mu.ac.in

 

 

Story img Loader