गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा समाजातील अधिकोधिक संवर्गाना मिळाव्यात याकरता देशभरात १६ केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आíथक आणि सामाजिक दृष्टय़ा दुर्बल घटकोंना परवडू शकेल असे गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक कोळाशी सुसंगत उच्च शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळावी, हा या संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.