इव्हेंट मॅनेजमेंट विषयक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची आणि असे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्थांची सविस्तर माहिती..
सार्वजनिक तसेच व्यक्तिगत समारंभांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना इव्हेन्ट मॅनेजमेंट क्षेत्राला गेल्या काही वर्षांत मोठी बरकत प्राप्त होत आहे. इव्हेन्ट मॅनेजमेंट विषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या काही संस्था..
नॅशनल अॅकॅडेमी ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट-
या संस्थेने बारावी आणि पदवीनंतरचे या क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
*बीबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *डिप्लोमा इन अॅस्पेक्ट्स ऑफ मीडिया, मार्केटिंग अॅण्ड इव्हेन्ट- कालावधी एक वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅस्पेक्ट्स ऑफ मीडिया, मार्केटिंग अॅण्ड इव्हेन्ट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. *एमबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो. या संस्थेचे अभ्यासक्रम हे भारतीयार विद्यापीठ कोइम्बतूरशी संलग्न आहेत. संपर्क- नॅशनल अॅकॅडेमी ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट, लॉर्ड्स युनिव्र्हसल, टोपीवाला मार्ग, स्टेशन रोडच्या बाजूला, गोरेगाव पश्चिम, मुंबई- ४०००६२. संकेतस्थळ- http://www.naemd.com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत –
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी ११ महिने. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. हा अभ्यासक्रम मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर, रायपूर या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
* पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी-
११ महिने. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर, रायपूर कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हर्टायजिंग, मीडिया अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. कालावधी ११ महिने. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. हा अभ्यासक्रम मुंबई, अहमदाबाद कॅम्पसमध्ये चालवला जातो.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणाचीही संधी मिळू शकते. संपर्क- १. तळमजला, व*भभाई रोड आणि अन्सारी रोड, नंदनवन कॉर्नर, विलेपाल्रे, मुंबई- ४०००५६.
ईमेल- support@niemindia.com चार, कमलप्रभा, अपार्ट्समेंट, पोलीस मदानाच्या विरुद्ध दिशेला, कॉर्न क्लबच्या बाजूला, फग्र्युसन रोड, पुणे- ४११०१६.
ईमेल- niem.events@gmail.com,
संकेतस्थळ- http://www.niemindia.com
इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन – या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी १ वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी. या अभ्यासक्रमात सादरीकरण आणि संवाद कौशल्य, परवाने व परवानगी, इव्हेंटची वर्गवारी, सेट डिझाइन, सेलिब्रिटी, आर्टस्टि आणि टॅलेन्ट मॅनेजमेंट, इव्हेंटची तंत्रे, सर्जनशील संकल्पना निर्मिती आणि कार्यान्वयन, इव्हेन्ट नियोजन व मूल्य निर्धारण, ब्रँड मॅनेजमेंट आणि विपणन आदी विषय शिकवले जातात. या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांचे अनुभव विदित करण्यासाठी बोलावले जाते. प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. * पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट- कालावधी १ वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. * पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट अॅण्ड एक्सपेरिमेंटल मॅनेजमेंट- कालावधी १ वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी. या अभ्यासक्रमात ब्रँड मॅनेजमेंट, विपणन (मार्केटिंग), सादरीकरण आणि संवाद कौशल्य, इव्हेंट नियोजन आणि त्यांचे विपणन, इव्हेन्ट्सविषयक सृजनशील कामे, प्रायोजकत्व मिळवणे, संकल्पनांची निर्मिती व त्याचे कार्यान्वयन, इव्हेंटचे तंत्र, सेलिब्रिटी, टॅलेन्ट मॅनेजमेंट, कायदेशीर बाजू, सेट डिझाइन, वित्त आणि कर नियोजन, विविध परवाने, विमा संरक्षण, उद्योजकता, प्रकल्प, व्यवसाय विकास आणि ग्राहक सेवा आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
* मुंबई कॅम्पस- पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट अॅण्ड एक्स्पेरिमेंटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट.
* इंदूर कॅम्पस- डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड अॅक्टिव्हेशन- कालावधी १ वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट/ डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट.
* दिल्ली कॅम्पस- डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड अॅक्टिव्हेशन, कालावधी १ वर्ष. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट/ डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अॅण्ड अॅक्टिव्हेशन, कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- ईएमडीआय इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन, ११/१२, पहिला मजला, फोरम बिल्डिंग, रघुवंशी मिल कंपाऊड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ,
मुंबई- ४०००१३. संकेतस्थळ- emdiworld.com
ईमेल- mumbai@ emdiworld.com
इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया, फॅशन अॅण्ड अलाइड आर्ट्स
या संस्थेने डिप्लोमा इन इव्हेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण. इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक. हा अभ्यासक्रम केल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट, जनसपंर्क, मीडिया, कम्युनिकेशन, सर्जनशील लेखन, कंटेंट प्रोव्हायडर, ग्राहक सेवा आदी क्षेत्रांत करिअर करण्याची संधी मिळू शकते. संपर्क- ३/३५, कमल मॅन्शन, आर्थर बंदर रोड, कुलाबा, मुंबई- ४००००५. संकेतस्थळ- http://www.rbcsgroup.com Imfaa/ MediaStudies.htm
बी. के. श्रॉफ कॉलेज ऑफ कॉमर्स
या संस्थेने डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. संपर्क- भूलाबाई देसाई रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई- ४०००६७.
संकेतस्थळ- http://www.kesshroffcollege.com
ईमेल- info@kesshroffcollege.com
लाइव्ह वायर्स मीडिया इन्स्टिटय़ूट
या संस्थेने सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेन्ट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम कोणालाही करता येतो.
संपर्क- अंधेरी पश्चिम, रेल्वे स्टेशन, मुंबई- ४०००५८.
संकेतस्थळ- http://www.livewires.org.in
ईमेल- livewireinstitute@gamil.com